Athiya Shetty Birthday : अथियाच्या वाढदिवसानिमित्त केएल राहुलने दिली प्रेमाची कबूली

Athiya Shetty Birthday: KL Rahul confesses his love on the occasion of Athiya's birthday
Athiya Shetty Birthday : अथियाच्या वाढदिवसानिमित्त केएल राहुलने दिली प्रेमाची कबूली

क्रिकेटविश्व आणि बॉलीवूड क्षेत्राचे प्रेमकथांबाबत नेहमीच समीकरण पाहायला मिळते. आज शनिवारी ६ नोव्हेंबरला अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त क्रिकेटर केएल राहुलने अथिया सोबतच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. केएल राहुलने अथियासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. हे फोटो शेअर करत केएल राहुलने त्याच्या प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. त्याने अथियासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. ‘हॅपी बर्थडे माय लव्ह’, अशा आशयाचे कॅप्शन केएल राहुलने या फोटोसाठी दिले आहे. या पोस्टवर अथियाने हार्टचा इमोजी पाठवला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अथिया आणि राहुल एकमेकांना डेट करत होते. मात्र आतापर्यंत त्यांनी कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. हे दोघेजण सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात,मात्र अजूनही वाढदिवसानिमित्त प्रेमाची कबूली दिली आहे. सोशल मिडियाच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

अथियाने मुबारका, नवाबजादे, मोतीचूर चकनाचूर या चित्रपटांमध्ये काम केले आहे.  ‘हिरो’ या चित्रपटामधून २०१५ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.


हे ही वाचा – मंचावर उभे राहून सभा गाजवणाऱ्या गुलाबराव पाटलांनी गायली कव्वाली, सर्वांनाच केलं मंत्रमुग्ध