ATP Finals 2021 जोकोविचला पराभूत करुन ज्वेरेवची अंतिम फेरीत धडक, आता मेदवेदेवसोबत होणार टक्कर

ATP Finals 2021 Alexander zverev beats novak djokovic in ATP semi final
ATP Finals 2021 जोकोविचला पराभूत करुन ज्वेरेवची अंतिम फेरीत धडक, आता मेदवेदेवसोबत होणार टक्कर

जगातील दुसऱ्या नंबरचा स्टार पुरुष टेनिस खेळाडू जर्मनीच्या क अलक्जेंडर ज्वेरेवने एटीपी फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. उपांत्य फेरीत जगातील आघाडीचा टेनिस खेळाडू सर्बियाच्या नोवाक जोकोविचला २-१ ने पराभूत केलं आहे. ज्वेरेवने ही स्पर्धा ७-६, ४-६ आणि ६-३ अशा फरकाने जिंकली आहे. आता अंतिम सामन्यात अलक्जेंडर ज्वेरेवचा सामना जगातील तिसऱ्या नंबरचा खेळाडू रुस दानिल मेदवेदेवसोबत होणार आहे.

उपांत्य फेरीत दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळी केली. पहिल्या सेटमध्ये जोकोविच आणि ज्वेरेव यांनी एकमेकांना चांगलीच टक्कर दिली होती. परंतु या सेटचा निर्णय हा बरोबरीचा झाला यामुळे ज्वेरेव ७-६ अशा फरकाने सामना आपल्या नावे करण्यास यशस्वी ठरला आहे. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने चांगली खेळी करत ६-४ ने सामना जिंकला मात्र तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचकडून काही चुका झाल्या आणि याचा फायदा ज्वेरेवला झाला. तिसऱ्या सामन्यात जोकोविच पिछाडीवर आल्यावर आघाडी घेण्यात असमर्थ ठरला आहे. ज्वेरेवने तिसऱ्या सेटमध्ये ६-३ अशा फरकाने सामना जिंकला आहे.

अंतिम सामन्यात धडक दिल्यानंतर ज्वेरेव म्हणाला की, जर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने वापसी केल्यावर कायम आव्हान ठेवले असते तर तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचला पराभूत करणं अवघड झालं असते. यामुळे काही वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा विचार केला.

अंतिम सामन्यात अलक्जेंडर ज्वेरेवचा सामना आता रशियाच्या दानिल मेदवेदेवसोबत होणार आहे. मेदवेदेवने उपांत्य फेरीत नॉर्वेच्या केस्पर रुडला ६-४, ६-२ अशा फरकाने पराभूत केलं आहे. २०१८ मध्ये एटीपी फायनल जिंकणाऱ्या अलक्जेंडर ज्वेरेवचा सामना फायनलमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन दानिल मेदवेदेवसोबत होणार आहे.


हेही वाचा : WI Vs SL: खेळाडूच्या चेहऱ्यावर आदळला चेंडू, वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंकेच्या कसोटीदरम्यान गंभीर दुखापत