Alexander Zverev Controversy : एलेक्जेंडर ज्वेरेवविरोधात मोठी कारवाई, २५ हजारांचा दंड आणि ८ आठवड्यांची बंदी

ATP governing bodys action against Alexander Zverev fine of Rs 25,000 and 8 weeks ban
Alexander Zverev Controversy : एलेक्जेंडर ज्वेरेवविरोधात मोठी कारवाई, २५ हजारांचा दंड आणि ८ आठवड्यांची बंदी

ऑलिम्पिक चॅम्पियन आणि स्टार टेनिसपटू जर्मनीच्या एलेक्जेंडर ज्वेरेव वर एटीपीच्या बोर्डाने मोठी कारवाई केली आहे. टेनिस जगतामधील तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूवर दंडात्मक आणि ८ आठवड्यांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर २५ हजार डॉलरची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जी अकापुल्को एटीपी ५०० टेनिस स्पर्धेच्या बक्षीस रकमेपेक्षा जास्त आहे. या ८ आठवड्यांमध्ये ज्वेरेव जे गुण एकेरी आणि दुहेरी स्पर्धांमध्ये मिळवेल त्या ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तसेच त्याला १ वर्षाच्या प्रोबेशनवर ठेवण्यात येणार असून त्याच्या वर्तनावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

ज्वेरेवने अलीकडे झालेल्या अकापुल्को एटीपी टेनिस ५०० या स्पर्धेत दुहेरी सामना गमावल्यावर संतापला होता. त्याने पंचांना शिवीगाळ केला असून खूर्चीवर रॅकेट फेकून मारला होता. अकापुल्कोमध्ये सामना गमावल्यावर ज्वेरेव नाराज झाले. यानंतर तो अंपायर एलसेंड्रोंच्या खुर्चीकडे पोहचले यानंतर त्यांना मारण्यासाठी रॅकेट घेऊन त्यांच्या जवळ आले. ज्वेरेवने अंपायच्या खुर्चीवर रॅकेट मारले. त्याने शेवटी आपल्या गैरवर्तवनाबद्दल माफी मागितली आहे. परंतु त्याला या स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे.

ज्वेरेवच्या वर्तनावर आढावा बैठक घेण्यात आली होती. बैठकीत २४ वर्षीय खेळाडू ज्वेरेवचे वर्तन हिंसक असल्याचे आढळलं आहे. यामुळे समितीने त्याला २५ हजार डॉलरची शिक्षा केली असून ८ आठवड्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निलंबनादरम्यान तो टेनिसच्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.

या प्रकरणातील आढावा बैठकीनंतर एटीपीला 24 वर्षीय तरुणाने हिंसक वर्तन केल्याचे आढळून आले. यानंतर, अतिरिक्त $25,000 दंडाव्यतिरिक्त त्याच्यावर 8 आठवड्यांची बंदी घालण्याचा हुकूम जारी करण्यात आला. निलंबनादरम्यान तो कोणत्याही टेनिस स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.


हेही वाचा : women’s day : भारताला विश्वविजेता करण्याची जबाबदारी या महिलांवर, २०१७ मधील स्वप्न पूर्ण होणार का?