घरक्रीडाT20 World Cup2021: Pak vs AFG और कोई हुकूम पाकिस्तान ? ४...

T20 World Cup2021: Pak vs AFG और कोई हुकूम पाकिस्तान ? ४ षटकारानंतर अलीचा सवाल

Subscribe

संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि ओमान येथे खेळले जाणाऱ्या टी २० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या टीमने केलेल्या कामगिरीचे दिवसेंदिवस कौतुकच होत आहे. अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या पाकिस्तान संघाने आतापर्यंतच्या सर्वच सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. भारतापासून या मालिकेची सुरूवात करत असताना भारताला १० विकेट्सने हरवण्याची कामगिरी पाकिस्तानने केली. त्यानंतरच्या न्यूझीलंड बरोबरच्या सामन्यात पाकिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्तानने दिलेल्या कडव्या झुंजीमध्ये पाकिस्तानला मालिकेत पराभवाचा सामना करावा लागेल की काय ? असे चित्र निर्माण झालेला असतानाच पाकिस्तानने विजय खेचून आणला. अवघ्या एकाच सामन्यात संपुर्ण सामन्याचे चित्र पलटणारी कामगिरी आसिफ अलीने केली. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये पाकिस्तानला २४ धावांची गरज होती. पण सामन्यातील १९ वी ओव्हरच सामना संपुष्टात आणण्यासाठी निर्णायक ठरली. या सामन्यात चार षटकार लावत पाकिस्तानने विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानकडून विजय अक्षरशः खेचून आणण्याचे कामच या आसिफ अलीने केले.

७ बॉलमध्ये केल्या २५ धावा

आसिफ अलीने अतिशय आक्रमक खेळी करत सामन्यात २५ धावांची आक्रमक खेळी केली. अवघ्या ७ बॉल्समध्ये २५ धावांच्या खेळीसाठी आसिफ अलीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट फॅन्ससाठी आसिफ अलीने एक मजेदार ट्विटही केले. आपल्या ट्विटमध्ये त्याने पाकिस्तानच्या फॅन्ससाठी म्हटले की, आणखी काही हुकुम पाकिस्तान ? इस्लामाबाद युनायटेड आणि कठीण काळात साथ देणाऱ्या सर्वांचे त्याने आभार मानले.

- Advertisement -

पाच विकेट्सने जिंकला सामना

या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत सहा विकेट्स गमावत १४७ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी आणि गुलबदीन नायबने अनुक्रमे ३३ आणि ३५ धावांची खेळी केली. पाकिस्तानचा सर्वात यशस्वी गोलंदाज हा इमाद वसीन राहिला. त्याने दोन विकेट्स घेतल्या. पण हे विजयाचे लक्ष्य पाकिस्तानने १९ व्या ओव्हरमध्येच पूर्ण केले. या सामन्यात बाबर आजमने ५१ धावा केल्या. त्याशिवाय फखर जमा ३० आणि शोएब मलिकने १९ धावांची खेळी केली. पण सहाव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या आसिफ अलीने कमालीची कामगिरी केली. युएईच्या करीम जनातच्या एकाच ओव्हरमध्ये चार षटकार लगावले अन् पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -