AUS vs ENG 2nd Test : ऑस्ट्रेलियाची सलग दुसऱ्या विजयाकडे कूच; इंग्लंडला विजयासाठी ३८६ धावांची गरज

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील लोकप्रिय ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील लोकप्रिय ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात मिळवेल्या अभुतपूर्व यशानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यातही विजयाकडे कूच केली आहे. मिचेल स्टार्कने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला शेवटच्या षटकात बाद केले, बदल्यात ऑस्ट्रेलियाने रविवारच्या दिवसाअखेर इंग्लिश संघाला ४ बाद ८२ धावांवर रोखले आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ४६८ धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवल्यानंतर ॲशेसच्या दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाने विजयाकडे कूच केली आहे.

चौथ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात स्टार्कने रूटला २४ धावांवर बाद केले. दरम्यान, इंग्लंडला आता विजयासाठी इतिहास रचण्याची गरज आहे. झाय रिचर्डसनने त्याच्या पहिल्याच षटकात सलामीवीर रॉरी बर्न्सला माघारी पाठवले, तर इंग्लंडचा दुसरा सलामीवीर हसीब हमीदला देखील रिचर्डसनने खाते न उघडताच तंबूत पाठवले. इंग्लंडकडून रॉरी बर्न्स (३४) आणि डेविड मलान (२०) यांनी ४४ धावांची भागीदारी केली.

तत्पुर्वी, मधल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ९ बाद २३० धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील शतकवीर मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सर्वाधिक धावा केल्या, त्यांनी प्रत्येकी ५१ धावा केल्या, कॅमरॉन ग्रीनने नाबाद ३३ धावा केल्या. सराव सामन्यात रुटला दुखापत झाल्याने इंग्लंडचा कर्णधार खेळाच्या सुरुवातीला मैदानात उतरू शकला नव्हता.

चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या डावातील ४३.२ षटकांचा खेळ झाला. इंग्लंडला अजून विजयासाठी ३८६ धावांची गरज आहे तर यजमान ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ६ बळींची गरज आहे. चौथ्या दिवशीही ऑस्ट्रेलियन संघाने शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाकडून झाय रिचर्डसनने सर्वाधिक २ बळी घेतले तर मिचेल स्टार्क आणि मायकेल नेसर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. इंग्लंडकडून अष्टपैलू बेन स्टोक्स ४० चेंडूत ३ धावांवर नाबाद खेळत आहे.


हे ही वाचा: http://Asian Champions Trophy 2021: भारताने जपानचा ६-० ने केला पराभव; आता उपांत्यफेरीकडे लक्ष