घरक्रीडाAUS vs ENG Ashes Series : पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग XI...

AUS vs ENG Ashes Series : पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग XI ची घोषणा

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने ॲशेस मालिकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यांसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने ॲशेस मालिकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यांसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ॲशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. तसेच मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन गाबा येथे होणार आहे. दरम्यान संघाची घोषणा करताना कर्णधार कमिन्सने सांगितले, ट्रेविस हेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजाला ऑस्ट्रेलियाच्या संघात जागा मिळाली नाही. तर मिचेल स्टार्कचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

उस्मान ख्वाजाला अंतिम क्षणी संघातून डावलण्यावर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने म्हंटले की, “संघाने त्याला डावलणे हा एक कठीण निर्णय होता. मात्र दोन्हीही चांगले पर्याय आहेत. उस्मानकडे चांगला अनुभव आहे. आम्ही प्रत्यक्षात आम्हाला खूप भाग्यशाली समजतो की तो संघात आहे. पण ट्रेविसने मागील काही वर्षात खूप चांगली खेळी केली आहे”.

- Advertisement -

इंग्लंडकडून अद्याप संभ्रम कायम

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रूटने गाबा कसोटी सामन्यासाठी अद्याप इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली नाही. एका न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने सांगितले की, “आमच्याकडे सर्व पर्याय आहेत मात्र आम्ही आता कोणत्याही संघाची नावे सांगणार नाही. आम्हाला सर्व काही पहायला हवे, पुढील काही दिवसांत खेळपट्टी कशी बदलते यावर आम्ही ध्यान देत आहोत”. ब्रिस्बेनची खेळपट्टी आताच्या घडीला फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी अधिक चांगली आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्यावर आम्ही विचार करत आहोत मात्र अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही. असे जो रूटने आणखी म्हंटले.

ब्रिस्बेन कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग XI

मार्कस हॅरिस, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरॉन ग्रीन, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोस हेझलवुड,

- Advertisement -

हे ही वाचा: http://T10 League Final : आंद्रे रसेलची शानदार खेळी; डेक्कन ग्लॅडिएटर्सने अंतिम फेरीत मारली बाजी

 


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -