Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाAus vs Ind Test : सगळं ठीक असेल तर...; शमीबद्दल काय म्हणाला...

Aus vs Ind Test : सगळं ठीक असेल तर…; शमीबद्दल काय म्हणाला कर्णधार बुमराह?

Subscribe

गेल्या काही काळापासून भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्या संघातून बाहेर असल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील होणारी कसोटी मालिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर भारतीय संघाचे WTC 2023 – 2025 मधी भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करणे, अत्यावश्यक आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीची स्पर्धा सुरू होणार आहे. पहिला सामना हा पर्थच्या मैदानात असणार आहे. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माऐवजी कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहने संवाद साधला. (Aus vs Ind Test Captain Jasprit Bumrah on Mohammed Shami in Team India)

हेही वाचा : Rafael Nadal Retirement : लाल मातीच्या बादशहाची निवृत्ती 

- Advertisement -

पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यावेळी त्याला भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बुमराह म्हणाला की, “मोहम्मद शमीने आता क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. तो भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू आहे. सध्या भारतीय संघाचे व्यवस्थापन हे त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. सर्व गोष्टी ठीक असतील तर आपण शमीला भारतीय संघासाठी खेळताना पुन्हा पाहू शकतो,” असे विधान करत त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो, हे स्पष्ट केले आहे.

शमीची फिटनेस आणि कसोटी

मोहम्मद शमी हा भारतीय संघासाठी गेमचेंजर ठरणारा खेळाडू आहे. त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. टी – 20, एकदिवसीय किंवा कसोटी तीनही प्रकारात त्याने छाप पाडली आहे. पण एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर दुखापतीमुळे गेल्या बऱ्याच महिन्यांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर अनेक महिन्यांनंतर शमीने रणजी सामन्यात कमबॅक केला आणि तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक मालिकेत खेळणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी ही पर्थमध्ये खेळणार आहे. त्यामुळे यासाठी कर्णधार रोहित शर्माचा समावेश नसल्यामुळे भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. तो दुसर्‍या सामन्यासाठी पुन्हा भारतीय संघात येऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, WTC 2023 – 2025 भारतीय संघ हा दुसर्‍या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला या मालिकेत धमाकेदार कामगिरी करत आपले दुसरे स्थान न गमावण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे या 5 सामन्यांच्या मालिकेत मोठा विजय मिळवणे अपेक्षित आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांचे या मालिकेकडे लक्ष लागले आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -