कोलकाता : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा 70 धावांनी पराभव करत अंतिम अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. यानंतर आता दुसरा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. परंतु या सामन्याच्या पूर्वसंध्येला पावसाचे आगमन झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे. (AUS vs SA Rain batting on eve of second semi final A headache for Australia)
हेही वाचा – शामीच्या ‘त्या’ गुन्ह्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलं ट्वीट; मुंबई पोलिसांनीही दिलं सडेतोड उत्तर
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकातातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. परंतु या सामन्याच्या पूर्वसंध्येला पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे नाणेफेकीच्या आधीपर्यंत खेळपट्टीवर कव्हर होते. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या पूर्वसंध्येला मोठा पाऊस झाला नसला तरी हलक्या सरीमुळे ऑस्ट्रेलिया संघाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा सामना सुरू असताना पाऊस आल्यास डर्कवर्थ लुईस नियम लागू होऊ शकतो किंवा सामना रद्द करावा लागू शकतो.
The covers are on at Eden garden Kolkata. pic.twitter.com/lXOhxT1IDG
— CricKeeda (@JustinKuldeep2) November 16, 2023
डर्कवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्यांदा फलंदाजी कतराना जास्त धावा केल्या तर त्यांना विजयी घोषित करण्यात येऊ शकते आणि सामना पावसामुळे रद्द झाल्यास दक्षिण आफ्रिका संघ अंतिम फेरीत सहज प्रवेश करेल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विश्वचषकातून बाहेर पडावे लागेल. कारण दक्षिण आफ्रिका संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – PM Modi on Mohammad Shami: PM Modi झाले मोहम्मद शामीचे फॅन, कौतुक करत म्हणाले…
दक्षिण आफ्रिका संघाने अंतिम फेरीत प्रवेश केल्यास त्यांना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक ट्रॉफीसाठी भारताशी सामना करावा लागेल. भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीचे तिकिट मिळवले आहे. या सामन्यात मोहम्मद शमीच्या 7 विकेटच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा 70 विकेट्सने पराभव केला आहे.