घरक्रीडाAUS vs WI Test Match : स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी; 'या' खेळाडूंला...

AUS vs WI Test Match : स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी; ‘या’ खेळाडूंला टाकलं मागे

Subscribe

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे सुरू असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथने या सामन्यात २०० धावांची नाबाद खेळी केली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे सुरू असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथने या सामन्यात २०० धावांची नाबाद खेळी केली आहे. स्मिथचे हे कसोटी क्रिकेटमधील २९वे शतक आहे. या शतकाच्या जोरावर स्मिथने इंग्लंडचा फलंदाज जो रूट याला मागे टाकले आहे. (aus vs wi steve smith scored 29th test century equaled sir don bradman)

आजच्या सामन्यातील द्विशतकी खेळीच्या जोरावर स्टीव्ह स्मिथने क्रिकेटचे ‘सर’ डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी केली आहे. तसेच, सर्वाधिक कसोटी शतकं ठोकणाऱ्यांच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या यादीत स्मिथ आता ब्रॅडमन यांच्यासोबत चौथ्या क्रमांकावर आहे. रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ (३२), मॅथ्यू हेडन (३०) यांनी स्मिथपेक्षा जास्त कसोटी शतकं झळकावली आहेत. या शतकासह स्मिथनं मायकेल क्लार्कलाही मागे टाकलं आहे. क्लार्कनं २८ कसोटी शतकं झळकावली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, कसोटी क्रिकेटमधील सध्याच्या ‘फॅब फोर’मध्ये भारताचा विराट कोहली, इंग्लंडचा जो रूट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ याचा समावेश आहे. यांच्यापैकी ज्यो रूटच्या खात्यात २८ कसोटी शतके आहेत. विराटच्या नावावर २७ कसोटी शतकं आहेत, तर केन विल्यमसनच्या खात्यात २४ कसोटी शतकं आहेत. कसोटी शतकांच्या बाबतीत स्मिथ आता ‘फॅब फोर’मध्ये आघाडीवर आहे.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम भारताचा माजी स्टार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने कसोटी कारकीर्दीत तब्बल ५१ शतके झळकावली आहेत. शिवाय, ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी शतके रिकी पाँटिंगच्या नावावर आहेत. त्याने एकूण ४१ कसोटी शतके झळकावली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले रुग्णालयात दाखल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -