Ashes Series: कसोटी पदार्पणासाठी केली ८३ सामन्यांची प्रतिक्षा, ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

The Ashesh series

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरोधात एशेज सिरीजच्या निमित्ताने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी कसोटी संघाची घोषणा केली आहे. एकुण १५ सदस्यीय संघ ऑस्ट्रेलियाने घोषित केला आहे. या संघात विकेटकीपर म्हणून एलेक्स केैरी याचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियन संघात निवड झालेला एलेक्स केैरी हा कसोटी पदार्पण करणार आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलियासाठी २०१८ मध्ये वनडे आणि टी २० डेब्यू केला होता. तेव्हापासून एलेक्स केैरीने ऑस्ट्रेलियन संघासाठी ४५ एकदिवसीय सामने तर ३८ टी २० सामने खेळले आहेत. तब्बल ८३ आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर कसोटी खेळण्याची संधी एलेक्स केैरीला मिळाली आहे. यंदा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व हे पॅट कमिन्सच्या हातात आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे चेअरमन जॉर्ज बेली यांनी सांगितले की, एलेक्स हा गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय संघाचा भाग राहिला आहे. विशेषतः एकदिवसीय सामन्यातील त्याचा अनुभव आहे. तो एक चांगला क्रिकेटपटू आणि व्यक्तीही आहे. त्याच्या समावेशामुळे संघाची ताकद नक्कीच वाढेल. कसोटी संघात जागा मिळवण्याचा तो प्रबळ दावेदार होता असेही त्यांनी म्हटले आहे.

एलेक्स केरी ऑस्ट्रेलियन संघाकडून पदार्पण करणारा ४६१ वा खेळाडू असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेफील्ड शील्डमध्ये गेल्या २ सीझनमध्ये त्याने ५० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. केरी हा टीम पेनची जागा घेण्यासाठी उत्सुक आहे. एका महिलेला सहा वर्षांपूर्वी अश्लील मॅसेज पाठवल्या प्रकरणात टीम पेनने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद काही दिवसांपूर्वी सोडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर विकेटकीपर म्हणून खेळण्याचा निर्णय टीम पेनने घेतला होता. पण टीम पेनने नंतर मात्र क्रिकेटपासून काही कालावधीसाठी ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. टीम पेनने ब्रेक घेतल्याने ऑस्ट्रेलियन संघात जोश इंग्लिस आणि मॅथ्यू वेड यांच्यासोबतच एलेक्स केैरीही स्पर्धेत होता. पण या स्पर्धेत केरीने बाजी मारली.

काय आहे एलेक्स केेरीची प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियन संघात निवड झाल्यानंतर एलेक्स केैरीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संघात जागा मिळाल्याबद्दल मी खूपच आभारी आहे. आगामी कसोटी मालिकेसाठी ही निवड खूपच उत्साह वाढवणारी अशी आहे. ऑस्ट्रेलिया संघाला अॅशेज मालिका जिंकण्यासाटी संधी देण्यासाठी मीदेखील योगदान देणार आहे. देशासाठी सर्वश्रेष्ठ योगदान देणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान ८ डिसेंबरपासून पहिला सामना खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना १६-२० डिसेंबर दरम्यान एडिलेड ओवल येथे खेळला जाईल. याआधीची एशेज सिरीज २-२ ने ड्रॉ राहिली होती.

एशेज सिरीजसाठी पहिल्या २ कसोटी सामन्यासाठी टीम

पैट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ (उपकर्णधार), एलेक्स कैरी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, मार्कस हैरिस, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशाने, नाथन लॉयन, माइकल नेसर, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर और मिचेल स्वीपसन


Ind vs Nz : मुंबईतील टेस्ट मॅचवर नवं संकट, क्रिकेट रसिकांचा हिरमोड ?