घरक्रीडाIND vs AUS : भारताच्या गोलंदाजांपुढे कांगारू फेल; पहिला डाव १९५ धावांत...

IND vs AUS : भारताच्या गोलंदाजांपुढे कांगारू फेल; पहिला डाव १९५ धावांत संपुष्टात 

Subscribe

भारताकडून बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. 

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर बॉक्सिंग-डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ १९५ धावांतच संपुष्टात आला. याचे उत्तर देताना पहिल्या दिवसअखेर भारताची १ बाद ३६ अशी धावसंख्या होती. मिचेल स्टार्कने मयांक अगरवालला खातेही न उघडता माघारी पाठवले. मात्र, कसोटीत पदार्पण करणाऱ्या सलामीवीर शुभमन गिलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा तेजतर्रार मारा अप्रतिमरीत्या खेळून काढला. दिवसअखेर तो २८ धावांवर नाबाद होता.

त्याआधी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, बुमराह (५६ धावांत ४ विकेट) आणि अश्विन (३५ धावांत ३ विकेट) यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत टाकले. मोहम्मद शमीला दुखापत झाल्याने मोहम्मद सिराजला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचा उपयोग करत सिराजने दोन गडी बाद केले. यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या मार्नस लबूशेनचाही (४८) समावेश होता. लबूशेनला ट्रेव्हिस हेड (३८) आणि मॅथ्यू वेड (३०) यांची साथ लाभली. परंतु, हे तिघेही चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव १९५ धावांतच संपुष्टात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -