घरक्रीडाNovak Djokovic Visa : ऑस्ट्रेलियन सरकारने नोव्हाक जोकोविचचा दुसऱ्यांदा व्हिसा केला रद्द

Novak Djokovic Visa : ऑस्ट्रेलियन सरकारने नोव्हाक जोकोविचचा दुसऱ्यांदा व्हिसा केला रद्द

Subscribe

जागतिक पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा व्हिसा रद्द केल्यामुळे चर्चेला उधाण आलंय. ऑस्ट्रेलियन मेलबर्नमध्ये आल्यानंतर त्याचा प्रवेश व्हिसा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे जोकोविचने कोर्टात धाव घेतली होती. तसेच तो जिंकला सुद्धा होता. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने व्हिसा रद्द करण्याच्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाची बाजू फेडरल कोर्टाने पलटवली. न्यायालईन लढाई जिंकल्यामुळे नोव्हाकने न्यायाधीशांचे आभारही मानले. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारने नोव्हाकला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारने नोव्हाक जोकोविचचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द केलाय. ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन मंत्र्यांनी जनहितार्थ टोकाचे पाऊल उचलले आहे. दुसऱ्यांदा व्हिसा रद्द केल्यामुळे जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याच्या आशा संपल्या आहेत. या स्पर्धेला ९ जानेवारीपासून सुरूवात झाली असून ३० जानेवारीपर्यंत चालणार आहे.

- Advertisement -

जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय

फेडरल सरकारने नोव्हाक जोकोविचला मागील काही दिवसांपूर्वी व्हिसा रद्द न करण्याबाबत मोठा दिलासा दिला होता. परंतु फेडसर सरकारने पलटी मारली असून जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करणं सार्वजनिक हिताचं होतं, असे व्हिसा रद्द करण्यात आल्यानंतर सांगण्यात आले.

- Advertisement -

व्हिसा रद्द न करण्याचे दिले होते आदेश

न्यायाधीशांनी १० जानेवारी रोजी जोकोविचच्या बाजूने निकाल देत व्हिसा रद्द न करण्याचे आदेश दिले. यासोबतच त्याला तात्काळ डिटेन्शन सेंटरमधून अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जोकोविचला ऑस्ट्रेलियातून बाहेर पाठवण्याचा अधिकार सरकारकडे अजूनही आहे. नियम आणि कायदे सर्वांसाठी समान आहेत, या अंतर्गत व्हिसा रद्द देखील केला जाऊ शकतो, असं देखील न्यायाधीशांनी सांगितलं होतं. त्यानुसार ऑस्ट्रेलियन सरकारने नोव्हाक जोकोविचचा दुसऱ्यांदा व्हिसा रद्द केला आहे.

दरम्यान, नोव्हाक जोकोविचचा व्हिसा रद्द केल्यामुळे त्याला लवकरच ऑस्ट्रेलिया सोडावं लागणार आहे. अशा परिस्थितीत जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला सुद्धा मुकावं लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : IND vs SA: भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटिव्ह, वनडे मालिकेत खेळण्यावर शंका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -