घरक्रीडाशिव्या दिल्याने T20 विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला बाहेरचा रस्ता

शिव्या दिल्याने T20 विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला बाहेरचा रस्ता

Subscribe

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार असून सर्व संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. तसेच, सर्व खेळाडूंनी सरावालाही सुरूवात केली आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार असून सर्व संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. तसेच, सर्व खेळाडूंनी सरावालाही सुरूवात केली आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया संघासाठी या टी-20 विश्वचषकापूर्वी मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अॅरॉन फिंच याच्यावर शिवी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Australia captain Finch out of T20 World Cup for abuse of ICC rules)

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अॅरॉन फिंच याच्यावर शिवी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याने शिवी दिल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी कारवाई झाल्यास फिंच विश्वचषक खेळणार का, अशी चिंताही व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

स्टम्पच्या माईमध्ये अॅरॉन फिंच काय बोलला त्याचे रेकॉर्डिंग झाले आहे. त्यानंतर अॅरोन फिंचवर याप्रकरणी आरोप करण्यात आले होते. तसेच, फिंचने बीसीसीआयचा आरोप मान्यही केला आहे. त्यामुळे फिंचवरती मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि आयसीसीच्या नियमावलीमुळे सर्व खेळाडू आपल्याकडून स्पर्धेच्या आगोदर कसल्याही प्रकारची चुकी होऊ नये याची काळजी घेत आहे. दरम्यान, प्रत्येक संघ आपल्या खेळाडूला दुखापत आणि इतर गोष्टीपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण विश्वचषक स्पर्धेला अधिक महत्त्व असल्याने, अनेक खेळाडू आपल्याला खूप दिवसांनी खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पुर्णपणे तयार झाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘डबल एक्सएल’ चित्रपटातून भारतीय क्रिकेटर शिखर धवनचं बॉलिवूड पदार्पण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -