घरक्रीडाVideo: विराट कोहलीचा 'फिटनेस फंडा'

Video: विराट कोहलीचा ‘फिटनेस फंडा’

Subscribe

कर्णधार विराट कोहलीसोबतच संपूर्ण भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जोरदार तयारी करतो आहे. विराटसोबत अन्य खेळाडूही फिटनेसवर भर देत आहेत.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, २१ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरोधात टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाण्याअगोदर संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जिंकू आणि मगच मायदेशी परतू असं विराट यावेळी म्हणाला होता. आम्ही आता जिंकण्यासाठी सज्ज झाले आहोत. आपला संघ जिंकावा यासाठी प्रत्येक खेळाडूने वैयक्तीक पातळीवर मेहनत घेऊन जबाबदारी बाळगायला हवी, असंही कोहली यावेळी म्हणाला होता. दरम्यान, आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणार विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्येही सध्या भरपूर कसरत करत आहे. विराटसोबतच त्याची संपूर्ण टीमही सामन्यापूर्वी आपल्या फिटनेवर लक्ष देताना दिसत आहेत. विराटसह अन्य खेळाडू तासंतास जीममध्ये घाम गाळून मॅचसाठी जय्यत तयारी करत आहे. फिटनेस फ्रीक अशी ओळख असलेल्या विराटने जीममध्ये कसरत करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट स्वत:सोबतच टीम प्लेअर्सची कसरत करवून घेतो आहे. विराट नेहमीच एक्सरसाईज आणि डाएटची योग्य सांगड घालतो असं त्याचे सहकारी सांगतात. विशेषत: दौऱ्यासाठी बाहेर असताना तो आपल्या खाण्या-पिण्याकडे आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देतो. विराट देशातील अनेक तरुणांसाठी फिटनेसमधला रोल मॉडेलदेखील आहे.

 

View this post on Instagram

 

There’s no ideal way to put in hard work. Everyday is an opportunity. Stay fit stay healthy! ✌️??

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

- Advertisement -

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धची सिरीझ जिंकल्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी सज्ज झाला आहे. विंडीजसोबतच्या यशानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुध्दची मालिका जिंकण्याची जबाबदारी विराटसह संपूर्ण भारतीय संघावरती आहे. ऑस्ट्रेलिया सिरीज जिंकण्यासाठी खेळाची स्ट्रॅटजी पक्की करण्याची आवश्यकता असल्याचं विराटने पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं. पत्रकार परिषदेदरम्यान विराट म्हणाल होता की, सध्या आमच्याकडे गोलंदाज आक्रमक आहेत. त्यामुळे आता फलंदाजांवरही मोठी जबाबदारी आहे. टीममधील प्रत्येकजण चांगले प्रदर्शन करण्यासाठी आणि चुका सुधारण्यासाठी सज्ज झाले आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच आपला संघ जिंकावा यासाठी प्रत्येक खेळाडूने वैयक्तीक पातळीवर मेहनत घेऊन जबाबदारी बाळगायला हवी, असंही कोहली यावेळी म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाण्याअगोदर विराट कोहली आणि भारतीय संघाटे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी तो बोलत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -