घरक्रीडाWTCच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाकडून संघ जाहीर, ७ जूनला होणार टीम इंडियाविरुद्ध सामना

WTCच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाकडून संघ जाहीर, ७ जूनला होणार टीम इंडियाविरुद्ध सामना

Subscribe

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC)च्या फायनलसाठी ऑस्ट्रेलिया संघाने आपला संघ जाहीर केला आहे. येत्या ७ जून रोजी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार असून अखेरचा सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाने WTCच्या फायनलसाठी १७ खेळाडूंचा संघ निवडला आहे. तसेच त्याचे नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशीप आणि अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा निवडलेला संघ मजबूत दिसत आहे. तर अष्टपैलू मिचेल मार्श पूर्णपणे फिट होऊन संघात परतला आहे. मिचेल मार्शला तब्बल ४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळालं आहे. तसेच डेव्हिड वॉर्नरलाही संघात सामील करण्यात आलं आहे.

- Advertisement -

असा असेल ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (विकेटकिपर), अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, स्कॉट बोलँड, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

- Advertisement -

डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांचा सलामीवीर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे, तर मार्कस हॅरिसचाही सलामीवीर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. सध्या आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामाला सुरूवात झाली असून अनेक संघ आणि खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह इतर खेळाडू देखील चांगली खेळी करत आहेत.

दरम्यान, एकीकडे आयपीएलचं हंगाम सुरू असलं तरी दुसरीकडे टीम इंडियाचं संपूर्ण लक्ष ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे आहे. या स्पर्धेमुळे टीम इंडियाकडून संघ जाहीर करण्यात आलेला नाहीये. मात्र, या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : IPL 2023मध्ये रोहित शर्माच्या नावे ‘या’ नव्या विक्रमाची नोंद; विराट, धवनला टाकलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -