घरक्रीडाIND vs AUS : पुजारा, रहाणेला रोखावे लागेल - टीम पेन

IND vs AUS : पुजारा, रहाणेला रोखावे लागेल – टीम पेन

Subscribe

ऑस्ट्रेलियाला अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना रोखावे लागेल असे पेन म्हणाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली केवळ याच सामन्यात खेळणार असून त्यानंतर तो भारतात परतेल. उर्वरित तीन कसोटीत भारताला कर्णधार आणि सर्वात प्रमुख फलंदाज असलेल्या कोहलीची उणीव भासेल असे क्रिकेट समीक्षकांना वाटत आहे. मात्र, कोहलीच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला वाटते. तसेच या मालिकेत यशस्वी होण्यासाठी आम्हाला अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना रोखावे लागेल असेही पेन म्हणाला.

कोहलीच्या अनुपस्थितीतही भारतीय संघात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. पुजाराने मागील वर्षी आम्हाला खूप सतावले होते. त्यामुळे आम्हाला त्याला लवकर बाद करावे लागणार आहे. रिषभ पंतने सराव सामन्यात आक्रमक शैलीत फलंदाजी करताना शतक झळकावले. भारताकडे त्याच्यासारखे बरेच उत्कृष्ट फलंदाज आहेत. रहाणेने मागील मालिकेत एक बाजू लावून धरत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या मालिकेत आम्हाला त्याला रोखावे लागेल, असे पेनने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -