घरक्रीडाऑस्ट्रेलियाला धोनीसारख्या फिनिशरची गरज; माजी कर्णधाराचे मत

ऑस्ट्रेलियाला धोनीसारख्या फिनिशरची गरज; माजी कर्णधाराचे मत

Subscribe

ऑस्ट्रेलियाला धोनी किंवा हार्दिक पांड्या यांसारख्या फिनिशरची कमतरता जाणवत आहे.

ऑस्ट्रेलियन संघामध्ये बरेच अनुभवी क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियन संघ चांगली कामगिरी करू शकेल. परंतु, त्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी किंवा हार्दिक पांड्या यांसारख्या फिनिशरची कमतरता जाणवत असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यासाठी सक्षम असलेला यष्टीरक्षक ऑस्ट्रेलियाला सापडल्यास त्यांची समस्या दूर होऊ शकेल, असे पॉन्टिंगला वाटते. ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि मार्कस स्टोईनिस यांसारख्या खेळाडूंना फिनिशर म्हणून याआधी खेळवले आहे. परंतु, त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.

चांगल्या फिनिशरच्या शोधात

ऑस्ट्रेलियाला मागील काही काळात चांगल्या फिनिशरची कमतरता जाणवत आहे. अखेरच्या तीन-चार षटकांत ५० धावा करून संघाला सामने जिंकवून देणे हे एक कौशल्य आहे. हे कौशल्य प्रत्येक खेळाडूमध्ये नसते. त्यामुळे सर्वच संघ चांगल्या फिनिशरच्या शोधात असतात. धोनी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत फिनिशर म्हणूनच खेळला. तो त्याचे काम फार उत्कृष्टरित्या करायचा, असे पॉन्टिंगने सांगितले.

- Advertisement -

प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे

हार्दिक पांड्या आणि किरॉन पोलार्ड हे खेळाडूही आपल्या देशाला, तसेच आयपीएलमध्ये आपल्या संघाला सातत्याने सामने जिंकवून देतात. ऑस्ट्रेलियन संघात मात्र कोणताही फलंदाज सातत्याने फिनिशरची भूमिका पार पाडत नाही, असे पॉन्टिंग म्हणाला. मॅक्सवेल, मिचेल मार्श किंवा स्टोईनिस यांच्यापैकी नक्की फिनिशर कोण याची ऑस्ट्रेलियाला खात्री नाही. त्यांनी लवकरच या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे, असेही पॉन्टिंगने नमूद केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -