घरक्रीडास्मिथ, कुल्टर-नाईलचा झंझावात

स्मिथ, कुल्टर-नाईलचा झंझावात

Subscribe

विंडीजविरुद्ध ५ बाद ७९ अवस्था असतानाही मारली २८८ धावांपर्यंत मजल

स्टिव्ह स्मिथ आणि नेथन कुल्टर-नाईलच्या दमदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वचषकाच्या सामन्यात २८८ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात सुरुवातीच्या फलंदाजांना चांगले प्रदर्शन करण्यात आल्याने ऑस्ट्रेलियाची ५ बाद ७९ अशी अवस्था होती, मात्र स्मिथने ७३ आणि आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्‍या कुल्टर-नाईलने ९२ धावांची खेळी केली. कुल्टर-नाईलची ही खेळी विशेष होती, कारण एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर खेळणार्‍या फलंदाजाने केलेल्या या दुसर्‍या सर्वाधिक धावा आहेत.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विंडीजचे गोलंदाज शेल्डन कॉटरेल, आंद्रे रसेल आणि ओशेन थॉमस यांच्या भेदक मार्‍यामुळे ऑस्ट्रेलियाचे अ‍ॅरॉन फिंच (६), डेविड वॉर्नर (३), उस्मान ख्वाजा (१३), ग्लेन मॅक्सवेल (०), मार्कस स्टोइनिस (१९) हे खेळाडू झटपट माघारी परतले. यानंतर माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अ‍ॅलेक्स कॅरी यांनी मात्र संयमाने फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केल्यावर ४५ धावांवर खेळणार्‍या कॅरीला रसेलने शाई होपकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. स्मिथने चांगली फलंदाजी सुरु ठेवत ७७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला कुल्टर-नाईलने चांगली साथ दिली. कुल्टर-नाईलने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ४१ चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे संयमाने खेळणार्‍या स्मिथला ७३ धावांवर थॉमसने माघारी पाठवले. त्याने आणि कुल्टर-नाईलने सातव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. कुल्टर-नाईल मोठा फटका मारण्याच्या नादात कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ६० चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या. यानंतर ब्रेथवेटनेच स्टार्कला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव २८८ धावांत संपुष्टात आला.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया : ४९ षटकांत सर्वबाद २८८ (नेथन कुल्टर-नाईल ९२, स्टिव्ह स्मिथ ७३, अ‍ॅलेक्स कॅरी ४५; कार्लोस ब्रेथवेट ३/६७, आंद्रे रसेल २/४१, शेल्डन कॉटरेल २/५६) वि. वेस्ट इंडिज.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -