ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाला.

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटल्याची माहिती पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात सायमंड्स निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचंही निधन झालं.

अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा मृत्यू हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांसाठी या वर्षातील तिसरा धक्का आहे. सायमंड्सच्या मृत्यूनंतर अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली वाहिली. ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू जॉनस निल गिलेस्पीने सायमंड्सच्या मृत्यूसंदर्भात धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिलीय. “धक्कादायक बातमी आहे. आम्ही सर्वचजण तुला कायमच मीस करु मित्रा”, असं गिलेस्पीने म्हटलंय. तर दुसरीकडे अॅडम गिलक्रीस्टने, “हे खरोखर वेदनादायी आहे”, अशी प्रतिक्रिया दिलीय.

सायमंड्सच्या कुटुंबीय आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. क्रिकेट विश्वात तसेच इतर स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यामध्ये थायलंडमध्ये सुट्टीवर असताना शेन वॉर्नचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. आता त्याच्या काही आठवड्यांनंतरच क्रीडा जगताला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सायमंड्सची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट शेन वॉर्नला श्रद्धांजली देणारी होती.

सायमंड्सचं करिअर शानदार होतं. त्याने 198 वनडे सामन्यांमध्ये 5088 रन बनवले. यामध्ये सहा शतकं आणि 30 अर्ध शतकांचा समावेश आहे. सायमंड्स ऑल राऊंडर क्रिकेटपटू होता. त्याने या फॉर्मेटमध्ये 133 विकेट घेतल्या. तसेच 26 टेस्ट मॅचमध्ये 1462 रन काढण्याची कामगिरी केली आहे. शिवाय 24 विकेटही घेतल्या आहेत. सायमंड्स 14 टी 20 सामने खेळले.


हेही वाचा – कोरोनामुळे विकासकामांनां योग्य प्रमाणात निधी देता आला नाही : अजित पवार