Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा T20 world cup 2021: इंग्लडने ऑस्ट्रेलियाचा केला दारूण पराभव; ८ वर्षांपूर्वीचा जुना...

T20 world cup 2021: इंग्लडने ऑस्ट्रेलियाचा केला दारूण पराभव; ८ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम काढला मोडीत

Subscribe

टी २० विश्वचषकात सुपर १२ साठी झालेल्या शनिवारच्या लढतीत इग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करून हंगामात विजयी हॅट्रीक केली आहे

टी २० विश्वचषकात सुपर १२ साठी झालेल्या शनिवारच्या लढतीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करून हंगामात विजयी हॅट्रीक केली आहे. सोबतच या विजयाने इग्लंडने ८ वर्षाच्या जुन्या विश्वविक्रमाला मोडीत काढले. एक काळ होता जेव्हा इंग्लडच्या संघाला ऑस्ट्रेलियाचा पराभव करणे अशक्य होते, इतिहास काहीही असला तरी शनिवारच्या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज होते. अशातच इंग्लडने मोठ्या फरकाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून एका ऐतिहासिक विक्रमाला मोडीत काढले आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या मजबूत संघाचा शनिवारी इंग्लडने मोठ्या फरकाने पराभव करून ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका दिला.

दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाला इंग्लंडच्या संघाने फक्त १२५ धावांवर गुंडाळले. या तुरळक धावांचे आव्हान इंग्लंडने २ गडी गमावून फक्त ११.४ षटकांत पूर्ण करून एक मोठा विजय मिळवला. इंग्लंडने ५० चेंडू राखून सामन्यावर विजय मिळवला, ऑस्ट्रेलियन संघाचा एवढ्या मोठ्या फरकाने पहिल्यांदाच पराभव झाला आहे. हा नवीन विक्रम इग्लंडच्या नावावर झाला आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धचा हा विक्रम अगोदर पाकिस्तानच्या नावावर होता. २०१२ मध्ये दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा ३१ चेंडू राखून पराभव केला होता. ८ वर्षानंतर इग्लंडने पाकिस्तानच्या पुढे जात ऑस्ट्रेलियाचा आणखी मोठ्या फरकाने पराभव केला. उल्लेखणीय बाब म्हणजे याच वर्षात वेस्टइंडीजने ग्रोस एसलेट मध्ये ऑस्ट्रेलियाचा ३१ चेंडू राखून पराभव केला होता आणि पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

न्यूझीलंडने देखील याच वर्षात ऑस्ट्रेलियाचा वेलिंग्टनच्या सामन्यात २७ चेंडू राखून पराभव केला होता. हा पराभव ऑस्ट्रेलियन संघाच्या इतिहासातील तिसरा सर्वाधिक मोठा पराभव आहे.

- Advertisement -
- Advertisement -
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -