Virat Kohli Captaincy: विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत शेन वॉर्नचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि फिरकीपटू शेन वॉर्न टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहली एक प्रेरणादायक कर्णधार असल्याचं शेन वॉर्ननं म्हटलं आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात १-२ असा पराभूत झाला. त्यानंतर विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु लेग स्पीनरच्या या जादूगारनं टीम इंडियाच्या संघामध्ये कोहलीचं मोठं योगदान असल्याचं त्याने म्हटलंय.

बुक माय शोवर प्रसारित होणाऱ्या शेन या डॉक्यूमेन्ट्रीच्या प्रमोशनदरम्यान त्याने पीटीआयशी संवाद साधला. त्यावेळी वॉर्न म्हणाला की, विराट खूप उत्कृष्ट कर्णधार होता आणि त्याने आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा दिली. मला वाटते की, तो धोरणात्मक बाबींमध्ये तो सुधारणा करू शकला असता. पण कर्णधारपद त्याच्याकडे असेपर्यंत त्याने आपल्या सहकार्यांना नेहमीच प्रेरणा दिलेली आहे.

कसोटी सामन्यात विराटची भूमिका महत्त्वाची

कोहलीने ज्याप्रकारे कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन दिलंय. त्यामुळे भारताच्या माजी कर्णधारपदाबाबतचा आदर द्विगुणीत झालाय. तो ज्या पद्धतीने खेळतोय त्याप्रकारे मी विराट आणि बीसीसीआयचा आभारी आहे. कारण विराट खेळण्यामध्ये एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे.

विराटबद्दल माझ्या मनात खूप आदर

कसोटी सामन्यांमध्ये ७०९ विकेट्स घेणाऱ्या माजी फिरकीपटूने सांगितलं की, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की विराटबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. कारण तो एक शानदार क्रिकेटर आहे. कसोटी क्रिकेटला इतक्या पुढे नेल्याबद्दल विराट कोहली आणि बीसीसीआयला आपण सर्वांनी त्यांचे आभार मानायला पाहीजेत, असं शेन वॉर्न म्हणाला.


हेही वाचा : Ind Vs Sa : कर्णधारपदाच्या वादामुळे टीम इंडियाला धक्का?, आफ्रिका दौऱ्यात लाजीरवाणी कामगिरी