घरक्रीडाऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीचा अनोखा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीचा अनोखा विक्रम

Subscribe

महिलांच्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसर्‍या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने इंग्लंडवर ७ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने १ विकेट घेतली आणि फलंदाजीत नाबाद ४७ धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे तिने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स अशी दुहेरी कामगिरी करणारी ही पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

जगातील सर्वोत्तम महिला अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणार्‍या पेरीने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान इंग्लंडच्या नॅट स्किवरचा बळी घेत १०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. रविवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पेरीने ४७ धावांची खेळी करत एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. पेरीने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये १०४ सामन्यांत १०३ विकेट्स घेतल्या आहेत, तर फलंदाजीत २९ च्या सरासरीने १००५ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

१००० धावा आणि १०० विकेट्स मिळवणारी पहिली क्रिकेटपटू झाल्यानंतर ती म्हणाली, मी हा विक्रम केला याची मला कल्पना नव्हती. आम्ही पुरुषांइतकेच टी-२० क्रिकेट खेळतो. मी आता १०० हून अधिक सामने खेळले आहेत. त्यामुळेच कदाचित हा विक्रम मी करू शकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -