घरक्रीडामहाराष्ट्राच्या अविनाश साबळेची स्टीपलचेस शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदक पटकावत मोडला 'हा' रेकॉर्ड

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेची स्टीपलचेस शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदक पटकावत मोडला ‘हा’ रेकॉर्ड

Subscribe

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू जबरदस्त खेळी करत आहेत. शुक्रवारी रात्री कुस्तीपटूंनी आक्रमक खेळी करत पदके पटकावली. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

बर्मिंगहम : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू जबरदस्त खेळी करत आहेत. शुक्रवारी रात्री कुस्तीपटूंनी आक्रमक खेळी करत पदके पटकावली. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अविनाश साबळेने या शर्यतीत 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले आहे. (avinash sable wins silver medal in mens 3000m steeplechase at cwg 2022)

3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत अविनाश साबळे हा चौथ्या क्रमांकावर होता. अखेरच्या राऊंडपर्यंत अविनाशने हे स्थान कायम राखले होते. अखेरच्या राऊंडमध्ये अविनाशने झेप घेत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. त्याची ही धाव पाहून स्टेडियमवर असलेल्या प्रेक्षकांमध्ये भारताचा जयघोष होऊ लागला.

- Advertisement -

रौप्यपदक विजेता अविनाश साबळे हा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील रहिवाशी आहे. दरम्यान, जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत अविनाश इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अविनाशने 9 वेळा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. मार्च 2022 मध्ये त्याने इंडियन ग्रँड प्रिक्स 2 मध्ये 8:16:21 सेकंदाची वेळ नोंदवली होती.

याआधी झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर अविनाश घरी परतला असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. पण, त्यातून सावरत पुन्हा अविनाश मैदानात परतला आहे.

- Advertisement -

कोण आहे अविनाश साबळे?

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावात राहणाऱ्या अविनाश साबळेचा 13 सप्टेंबर 1994 मध्ये अविनाशचा जन्म झाला. वयाच्या 6 व्या वर्षापासून घर ते शाळा असा त्याचा रोजचा 6 किलोमीटरचा प्रवास होता. हा प्रवास अविनाश पायी करत असे. कधी-कधी अविनाशने धावत हे अंतर पार केले आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर म्हणजेच 12 वीनंतर अविनाश भारतीय सैन्यात 5 Mahar regiment मध्ये दाखल झाला.

2013-2014 मध्ये सियाचिन येथे त्याची पोस्टींग करण्यात आली. त्यानंतर 2015 मध्ये राजस्थान व सिक्कीम येथे त्याची पोस्टींग करण्यात आली होती. 2015 मध्ये अविनाशने आंतर-सैन्य क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेतला. पण, ट्रेनर अमरिष कुमार यांनी त्याला स्टीपलचेल (अडथळ्यांच्या शर्यतीत) सहभाग घेण्यास सांगितले.


हेही वाचा – Commonwealth Games 2022 : भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत दाखल; 4 रौप्यपदके निश्चित

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -