घरक्रीडाSuresh Raina : शास्त्रींनी मीटिंग बोलावल्यानंतर सुरेश रैनाला झाले अश्रू अनावर.., अक्षर...

Suresh Raina : शास्त्रींनी मीटिंग बोलावल्यानंतर सुरेश रैनाला झाले अश्रू अनावर.., अक्षर पटेलचा मोठा खुलासा

Subscribe

भारतीय संघाचा अष्टपैलू अक्षर पटेलने २०१४ साली ड्रेसिंग रुममध्ये झालेल्या गोष्टीबद्दल मोठा खुलासा केला आहे. ३० डिसेंबर २०१४ साली मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी टेस्ट ड्रॉ झाली. या टेस्टनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अचानक निवृत्तीची घोषणा करत सगळ्यांना मोठा धक्का दिला. मॅच सुरू झाल्यानंतर धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला होता. परंतु त्याने मॅच संपल्यानंतर मोठी घोषणा केली.

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी मीटिंग बोलावली होती. त्यावेळी त्यांनी धोनीच्या निर्णयाबाबत सर्वांना सूचित केलं. मीटिंगमध्ये घोषणा केल्यानंतर संघातील प्रत्येक जण भावूक झाला. जे काही होतं ते हैराण करणारं होतं. कारण मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच याची घोषणा करण्यात आली. परंतु घोषणा केल्यानंतर ड्रेसिंग रूममधलं संपूर्ण वातावरण बदलून गेलं, प्रत्येक जण शांत झाला होता. मात्र, ही माहिती सुरेश रैनाला मिळताच तो रडायला लागला, असं अक्षर पटेलने सांगितला.

- Advertisement -

माझ्या आजू-बाजूलाही प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. मी दुसऱ्याच दुनियेत होतो. नेमकं काय होतंय, हे मला कळलंच नाही, असं अक्षर पटेल म्हणाला. मी विचार करत होतो की काय झालं? या निर्णयाने संपूर्ण टीमला धक्का बसला. त्याच वेळी धोनी वेगळा होता. मला भेटताच त्याने माझा पाय ओढला आणि म्हणाला – बापू … तुम्ही आलात आणि मला निघायचे आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले.

तो दिवस आठवत अक्षर म्हणाला, माही भाई माझ्याशी असे का बोलले? मी विचार करत होतो की मी काय केले? या सगळ्यांचा विचार करून मी रडायला लागलो. यामध्ये त्याने आपण फक्त विनोद करत असल्याचे म्हटले आहे. यानंतर माही भाईने मला मिठी मारली.

- Advertisement -

अक्षर पटेल सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. दुसरीकडे सुरेश रैनावर आयपीएल लिलावात कोणत्याच टीमने बोली लावली नाही. त्यामुळे रैना आता आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत आहे. धोनीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ९० कसोटी सामन्यांच्या १४४ डावात ४८७६ धावा केल्या. त्याची सरासरी ३८.०९ होती. धोनीने ६ शतकं आणि ३३ अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच त्याची सर्वोच्च धावसंख्या २२४ इतकी आहे.


हेही वाचा : Jallianwala Bagh massacre : जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भारतात कोणते बदल झाले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मिळाली नवी दिशा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -