१० वर्षांपेक्षा मोठी आहे धवनची बायको आयशा, हरभजनने करून दिली होती मैत्री; वाचा इनसाईड स्टोअरी

ayesha mukherjee was 10 years older than shikhar dawan harbhajan singh had made friendship read the inside story
१० वर्षांपेक्षा मोठी आहे धवनची बायको आयशा, हरभजनने करून दिली होती मैत्री; वाचा इनसाईड स्टोअरी

भारताचा सलामीवीर (INDIAN CRICKET TEAM) शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukerji) या दोघांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे सध्या या दोघांची चांगलीच चर्चा सुरू आहे. आठ वर्षांपासून एकत्र राहणारे शिखर आणि आयशाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आयशा मुखर्जीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Ayesha Mukerji Instagram Account) शिखर धवनपासून घटस्फोट घेतल्याची माहिती दिली. पण अजूनही याबाबत शिखर धवनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे.

२०१२ साली शिखर धवन आणि आयशाने भारतीय परंपरेनुसार सात फेरे घेतले होते (Shikhar Ayesha Marriage). दोघांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव जोरावर (Zoravar) आहे. काल, मंगळवारी आयशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक भावनिक पोस्टच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आयशाने अजून एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने एक प्रश्न उपस्थितीत केला. तुमच्या घटस्फोटानंतर मित्र-मैत्रिणींनी तुमची साथ सोडली का? असा प्रश्न विचारत तिने घटस्फोटानंतर महिलांचा समाजात कसा अनुभव असतो यावर ती बोलली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

आयशा मुखर्जीचे वडील बंगाली असून आई ऑस्ट्रेलियाची आहे. या दोघांची भेट भारतात झाली. आयशाचा जन्म देखील भारतात झाला. पण तिचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला निघून गेले. माहितीनुसार, शिखर धवन आणि आयशाची ओळख फेसबुकद्वारे झाली होती. पण दोघांची भारतीय क्रिकेटर हरभजन सिंहने भेट घालून दिली होती. हजभजन सिंहने (harbhajan singh) आयशाला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. हळूहळू शिखर आणि आयशामध्ये बोलणं सुरू झालं आणि मग त्यांनी लग्न केलं. आयशा शिखर धवनपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.

आयशाची करिअरची सुरुवात बॉक्सिंगपासून झाली होती. ती मेलबर्नमध्ये बॉक्सर होती. आयशाची शिखर धवनसोबत दुसरे लग्न आहे. पहिल्या पतिपासून आयशाला दोन सुंदर मुली आहेत. आयशा आणि शिखरला एक मुलगा आहे. पण आता घटस्फोट झाल्यानंतर आयशाने इन्स्टाग्राम प्रोफाईलवरील नाव बदलले असून धवन आडनाव नावातून हटवले आहे.


हेही वाचा – Akshay Kumar Mother Death: अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन