T-20 Cricket : टी-२० क्रिकेटमध्ये पाकच्या बाबर आझमचा नवा विक्रम, क्रिस गेल, कोहलीला टाकलं मागे

क्रिस गेलला मागे सोडून बाबर आझम पहिल्या स्थानावर आला आहे.

babar azam breaks kohli and chris gayle record and make fastest 7000 run
T-20 Cricket : टी-२० क्रिकेटमध्ये पाकच्या बाबर आझमचा नवा विक्रम, क्रिस गेल, कोहलीला टाकलं मागे

जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचे नाव घेतले जाते. आझमची नेहमी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत तुलना केली जाते. क्रिकेटमध्ये बाबर आझम अनेक नवे विक्रम आपल्या नावे करत चालले आहेत. काहीदिवसांपुर्वी पाकिस्तानमध्ये झालेल्या टी-२० क्रिकेटमध्ये आझमने सहावे शतक केले आहे. विराट कोहलीने टी२० मध्ये आतापर्यंत केवळ ५ शतक केले आहेत. आता बाबर आझम आशियाई खेळाडू टी २० क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त शतकच्या नंबरमध्ये रोहित शर्माच्या बरोबरीला आले आहेत. रोहित शर्मा आणि बाबर आझमचे टी-२० क्रिकेटमध्ये सहा-सहा शतक केले आहेत.

बाबर आझमने तोडला क्रिस गेलचा विक्रम

बाबर आझमने टी२० क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. क्रिकेटच्या मर्यादित षटकांमध्ये सगळ्यात वेगवान ७००० धावा पुर्ण करणारा पहिला फलंदाज बनला आहे. तसेच बाबर आझमने कमी इनिंगमध्ये विक्रम करुन क्रिस गेल, विराट कोहलीसारख्या फलंदाजांना मागे सोडलं आहे. बाबर आझमने टी२० मध्ये १८७ वी इनिंगमध्ये ७००० रनांचा आकडा पुर्ण केला आहे.

टी२० क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिले क्रिस गेलने ७००० रनांचा आकडा पुर्ण केला आहे. तर क्रिस गेलने १९२ इनिंगमध्ये हा विक्रम रचला होता. क्रिस गेलला मागे सोडून बाबर आझम पहिल्या स्थानावर आला आहे. यामध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानी असून विराटने २१२ टी२० इनिंगमध्ये ७००० धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानी आरोन फिंच आहेत ज्याने २२२ इनिंगमध्ये तर डेविड वार्नरने हा विक्रम २२३ इनिंगमध्ये केला आहे.


हेही वाचा : नाशकात टेबल टेनिस एक्सलन्स सेंटरसाठी सहकार्य