PAK vs ENG : ICC विश्वचषक स्पर्धेतील 44 वा सामना हा उद्या शनिवारी (ता. 11 नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. हा सामना इंग्ंलड आणि पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. पाकिस्तानचा संघ विश्वचषकाच्या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. कारण पाकिस्तानला शेवटच्या चार संघामध्ये प्रवेश करायचा असेल तर इंग्लंडला शेवटच्या सामन्यात किमान 287 धावांनी पराभूत करावे लागेल किंवा धावांचा पाठलाग करताना 3.4 षटकात लक्ष्य गाठावे लागेल. या दोन्ही परिस्थिती अशक्य आहेत. अशा स्थितीत पाकिस्तान उपांत्य फेरीतून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे. पंरतु, विश्वचषकातील हे गणित इतके सोपे असतानाही पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने संघाला उपांत्य फेरीत नेण्याचा दावा केला आहे. (Babar Azam claims to lead the team to the semi-finals despite being out of the World Cup)
हेही वाचा – पाकिस्तान संघाचा विश्वचषकातील प्रवास थांबला; सेहवाग म्हणाला- ‘पाकिस्तान जिंदा भाग’
गुरुवारी (ता. 09 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला. ज्यामुळे आता पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग हा जवळपास बंद झाला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडला 287 धावांनी पराभूत करावे लागेल. तर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केल्यास इंग्लंडला 50 धावांवर ऑलआउट करून 2 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. याशिवाय 100 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर तीन षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. परंतु, उद्याच्या सामन्यात असे काही घडणे हे जवळपास अशक्य आहे.
परंतु, असे असतानाही बाबर आझमने रन रेटचे गणित सोडवत पाकिस्तानला उपांत्य फेरीत नेण्याचा दावा करत म्हटले आहे की, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. आम्ही स्पर्धेचा उच्चांकावर शेवट करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे नेट रन रेटची योजना आहे आणि आम्ही त्याचा वापर करू. पहिली 10 षटके कशी खेळायची आणि त्यानंतर काय करायचे याची योजना आहे. तसेच, जर फखरने 20-30 षटके खेळली तर आम्हाला हवे ते साध्य करता येईल. या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांची भूमिकाही महत्त्वाची असेल, असे त्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
यावेळी बाबर आझमने संघावर टीका करणाऱ्यांना सुद्धा प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी तीन वर्षे कर्णधार आणि कामगिरी करत होतो. टीव्हीवर बसून गोष्टी बोलणे सोपे आहे. ज्यांना मला सल्ला द्यायचा असेल त्यांनी माझ्या नंबरवर संपर्क साधावा. सध्या माझे लक्ष पुढील सामन्यावर आहे. कर्णधारपदाच्या भविष्याबद्दल मी नंतर विचार करेन, असे प्रत्युत्तर त्याच्याकडून देण्यात आले आहे. परंतु, आता बाबरने संघाला उपांत्य फेरीत नेल्याचा दावा केल्याने त्याच्यात हा आत्मविश्वास येतो कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.