आनंदी राहण्यासाठी.., सेक्सटिंगच्या आरोपानंतर बाबर आझमचं पहिलं ट्विट व्हायरल

babar aazam

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर बाबरचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती बाबर असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, सेक्सटिंगच्या आरोपानंतर बाबरनं पहिलं ट्विट केलं आहे. मात्र, हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मायदेशात आणि कसोटी मालिका गमावल्यानंतर बाबर आझमच्या कर्णधारपदावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष नजम सेठी आणि मॅनेजमेंट लवकरच बाबरला तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटवू शकतात, असंही म्हटलं जात आहे.

बाबरने त्याच्या कूल लूकचा एक फोटो शेअर केला आहे. बाबरने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत बाबर नदीच्या काठावर बसलेला दिसत आहे. आनंदी राहण्यासाठी फार काही लागत नाही, असं पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे.

बाबरचे काही वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून एका मुलीने त्याच्यावर सेक्सटिंगचा आरोप केला आहे. ही मुलगी दूसरी कोणी नसून पाकिस्तान संघातील खेळाडूंमधून गर्लफ्रेंड आहे. या संपूर्ण प्रकरणावर बाबरने मौन पाळले असून त्याने आपला फोटो शेअर करत एक ट्विट केले आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, याआधीही बाबर आझमवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. लाहोरमधील हमिजा मुख्तार या महिलेने बाबरने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले होते. पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत 0-3 असा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत 0-0 अशी बरोबरी झाली.


हेही वाचा : माझी शस्त्रक्रिया यशस्वी.., अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया