घर क्रीडा Babar Azam : पाक कर्णधार बाबर आझमचा विक्रम; पटकावला पहिला क्रमांक

Babar Azam : पाक कर्णधार बाबर आझमचा विक्रम; पटकावला पहिला क्रमांक

Subscribe

Babar Azam : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार पदाला साजेशी खेळी करताना एकदिवसीय क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाने अफगाणिस्तान विरुद्धचा दुसरा सामना 1 विकेट्सने जिंकला आहे. (Babar Azam Pakistan captain Babar Azam made a big record Won first place)

हेही वाचा –  IBSA World Games 2023 : भारतीय अंध महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियाचा पराभव केला अन्…

- Advertisement -

अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 301 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सलामीवीर फखर जमान 30 धावांवर बाद झाल्यानंतर इमाम-उल हक आणि बाबर आझम यांनी मोठी भागिदारी करताना पाकिस्तानला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला. यादरम्यान, इमाम-उल हक याने 105 चेंडूंत 91 धावांची खेळी तर, बाबर आझम याने 66 चेंडूंत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

बाबरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बनवल्या सर्वाधिक धावा

- Advertisement -

बाबर आझमने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या 100 डावात सर्वाधिक धावा करणारा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. बाबरने पहिल्या 100 डावात 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने एकूण 18 शतके आणि 26 अर्धशतकांसह 58 प्लसच्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत. हा विक्रम आपल्या नावावर करताना बाबरने दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हाशिम अमलाचा ​​विक्रम मोडीत काढला आहे.

हाशिम आमला सध्या दुसऱ्या स्थानावर घसरला असून त्याने पहिल्या 100 डावात 53.18 च्या सरासरीने 4946 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज विवियन रिचर्ड्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 56.87 च्या सरासरीने 4607 धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर शाई होप आहे. त्याने 100 डावात 50 प्लस सरासरीने 4436 धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Bray Wyatt : WWE मधील रेसलिंग चॅम्पियन ब्रे वॅटचे 36 व्या वर्षी निधन

शिखर धवन आणि विराट कोहलीला टाकले मागे

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत भारताचा सलामीवीर शिखर धवन सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 25 अर्धशतके आणि 13 शतकांच्या मदतीने 4343 धावा केल्या आहेत. याच यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 9व्या क्रमांकावर आहे. त्याने 13 शतके आणि 23 अर्धशतकांच्या मदतीने 4230 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानची अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी

दरम्यान, तीन एकदिवीसय सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान संघाने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिला सामना 142 धावांनी जिंकला होता तर, दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात एक विकेटने विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना शनिवारी (26 ऑगस्ट) खेळवला कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे.

- Advertisment -