घरक्रीडाआयसीसी ODI क्रमवारीत पाकिस्तानला फायदा; बाबर आझम फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल

आयसीसी ODI क्रमवारीत पाकिस्तानला फायदा; बाबर आझम फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल

Subscribe

आयसीसीने नुकताच वनडे क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीच्या नव्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानच्या खेळाडूंना याचा फायदा झाला आहे. या क्रमवारीत पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम अव्वल स्थानी कायम असून त्याने आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.

आयसीसीने नुकताच वनडे क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीच्या नव्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानच्या खेळाडूंना याचा फायदा झाला आहे. या क्रमवारीत पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम अव्वल स्थानी कायम असून त्याने आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. बाबरनंतर इमाम-उल-हक दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तसेच, गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह अव्वल 10 मध्ये एकमेव भारतीय आहे, जो दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार टी-20 मध्ये दुसऱ्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार दहाव्या क्रमांकावर आहे.

नेदरलँडविरुद्ध चांगली खेळी खेळणाऱ्या बाबर आझमने वनडेत पहिल्या स्थानावर आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमने नेदरलँड्सविरुद्ध 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. या खेळीमुळे त्याने पहिल्या क्रमांकावर आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. बाबरचे 891 रेटिंग गुण आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इमाम-उल-हकचे 800 रेटिंग गुण आहेत.

- Advertisement -

बाबर आझमने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याला मागे टाकून वनडे क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. तेव्हापासून तो पहिल्या स्थानावर राहिला आहे. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इमाम-उल-हकपेक्षा 91 रेटिंग गुणांची आघाडी आहे.

बाबर टी-20 मध्येही जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. मात्र, न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने दमदार कामगिरी करत सातव्या क्रमांकावर मजल मारली आहे. कॉनवेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 106 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. मिचेल सँटनरने टी-20 मधील गोलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा केली असून, तो नव्या स्थानांनी प्रगती करत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड पहिल्या स्थानावर कायम आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजांच्या क्रमवारीतही त्याचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी नेदरलँड्सविरुद्ध पहिला सामना खेळू शकला नाही आणि तो दोन स्थानांनी घसरून पाचव्या स्थानावर आला आहे.

बांगलादेशच्या मुस्तफिझूर रहमानने वनडेमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीत सर्वाधिक कमाई केली आहे. तो सहा स्थानांच्या प्रगतीसह 10व्या स्थानावर पोहोचला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे अव्वल स्थानावर होता.

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभ पंत पाचव्या तर कर्णधार रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन दुसऱ्या तर जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा पहिल्या तर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे.

वनडे क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत शिखर धवन 12 व्या तर केएल राहुल 31 व्या स्थानावर आहे. या दोघांना चांगली कामगिरी करून क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी असेल.


हेही वाचा – आशिया चषकातील ‘या’ सामन्याच्या तिकिटांच्या बुकिंगवेळी वेबसाइट क्रॅश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -