IPL 2022 AUCTION : आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये Baby डिव्हिलियर्सवर कोटींचा वर्षाव होण्याची शक्यता, या संघातून खेळणार

अंडर-१९ वर्ल्डकप २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिसच्या नावाची जोरदार चर्चा रंगली. डेवाल्डने युगांडा अंडर-१९ संघाविरूद्धच्या सामन्यात ११० बॉलमध्ये १०४ धावा काढत तुफान फटकेबाजी केली होती. तसेच ब्रेव्हिसने आयपीएल २०२२ च्या ऑक्शनमध्ये आपल्या नावाची नोंदणी केली आहे. डेवाल्डच्या खेळण्याची स्टाईल महान दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्ससारखी आहे. त्यामुळे त्याला Baby डिव्हिलियर्स या नावाने ओळखले जाते. परंतु आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये बेबी डिव्हिलियर्सवर कोटींचा वर्षाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू

अंडर-१९ टीममध्ये उत्त्कृष्ट फलंदाजी केल्यामुळे चाहत्यांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत डेवाल्डने चारही सामन्यात फलंदाजी करत ९०.५० च्या सरासरीत ८६.३९ च्या स्ट्राईक रेटनुसार ३६२ धावा काढल्या आहेत. टुर्नामेंटमध्ये ब्रेव्हिसने १ शतक आणि ३ अर्धशतक केले आहेत. या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा ब्रेव्हिस पहिला खेळला ठरला आहे.

या संघातून खेळणार बेबी डिव्हिलियर्स

आयसीसीच्या वेबसाईटवर बेबी डिव्हिलियर्सने आपल्या भविष्यातील प्लॅनबाबत मोठा खुलासा केला आहे. ब्रेव्हिसचं स्वप्नं दक्षिण आफ्रिकेच्या सीनिअर टीमसोबत खेळण्याचं आहे. त्याला आयपीएलमध्ये प्रचंड आवड आहे. जर मला आयपीएलमध्ये संधी मिळाली तर मी आरसीबी या संघाकडून खेळीन, असं ब्रेव्हिस म्हणाला. सोशल मीडियावर त्याचे खेळतानाचे आणि शॉर्टचे फोटो चाहत्यांकडून व्हायरल केले जात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dewald Brevis (@dewald_brevis_17)

ब्रेव्हिस सामना खेळताना १७ नंबरची जर्सी घालतो. तसेच १७ नंबरची जर्सी एबी डिव्हिलियर्सची सुद्धा घालत होता. एबीची परवानगी घेतल्यानंतर १७ नंबरची जर्सी घालण्यास ब्रेव्हिसने सुरूवात केलीय. आयपीएल २०२२ चं मेगा ऑक्शन येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी मेगा ऑक्शनचं आयोजन कर्नाटकची राजधानी बंगळुरू होणार आहे.

ब्रेव्हिसचा रोल मॉडल एबी डिव्हिलियर्स

ब्रेव्हिसचा रोल मॉडल एबी डिव्हिलियर्स आहे. मागील सामन्यात भारतीय संघाविरोधात त्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये इतर खेळाडूंनी त्याच्या हातात Baby ABचं पोस्टर दिलं होतं. तसेच त्याने अर्धशतक झळकावल्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. आयसीसीने सुद्धा सोशल मीडियावर ब्रेव्हिसच्या कामगिरीवर प्रशंसा केली होती.


हेही वाचा : Brendan Taylor Ban: ब्रेन्डन टेलरविरोधात ICC ची मोठी कारवाई, दिली इतक्या वर्षांची कठोर शिक्षा