घरक्रीडाभारताची फुलराणी सायना नेहवालचा भाजप प्रवेश!

भारताची फुलराणी सायना नेहवालचा भाजप प्रवेश!

Subscribe

भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आज, अर्थात २९ जानेवारी रोजी सायनाचा भाजप प्रवेश होणार आहे. मूळची हरयाणाची असलेली सायना नेहवालचा पक्षप्रवेश हे भाजपसाठी मोठं यश मानलं जात आहे. सायना नेहवालने आपल्या कारकिर्दीमध्ये २४ आंतरराष्ट्रीय स्पर्धांची विजेतीपदं नावावर केली आहेत. २००९मध्ये सायना नेहवाल जगातली दुसऱ्या क्रमांकाची बॅडमिंटन पटू होती. तर २०१५मध्ये तिने पहिल्या स्थानी झेप घेतली. सायना नेहवालची मोठी बहीण चंद्रांशू नेहवाल हिने देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये सायना नेहवाल आणि तिची बहीण भाजपचा प्रचार करताना दिसणार आहेत.

आज खूप चांगला दिवस आहे. आयुष्यात खूप विजेतेपदं जिंकली. पण आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मला मेहनत करायला आवडतं. मोदीजी देशासाठी मेहनत करतात. त्यांच्यासोबत जर देशासाठी काही करायला मिळालं, तर ते माझं भाग्य असेल. मला राजकारणाची आवड आहे. मोदीजींनी देखील खेलो इंडियासारख्या योजनांमधून क्रीडा विश्वासाठी खूप काही केलं आहे.

सायना नेहवाल, भारतीय बॅडमिंटनपटू

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -