Indonesia Open 2021 : पी.व्ही सिंधूने सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

इंडोनेशिया ओपनमध्ये भारताच्या पी.व्ही सिंधूने गुरुवारी महिला एकेरीत जर्मनीच्या यव्होन लीचा सरळ सेटमध्ये पराभव करत इंडोनेशिया ओपन २०२१ च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

इंडोनेशिया ओपनमध्ये भारताच्या पीव्ही सिंधूने गुरुवारी महिला एकेरीत जर्मनीच्या यव्होन लीचा सरळ सेटमध्ये पराभव करत इंडोनेशिया ओपन २०२१ च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेतील तिसऱ्या मानांकित सिंधूने युऑनविरुद्ध चांगली कामगिरी करत अवघ्या ३७ मिनिटांत २१-१२, २१-१८ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सुरूवातीपासूनच्या अदलाबदलीनंतर दोन्ही खेळांडूनी चांगला खेळ केला. दरम्यान सिंधूने ६-४ अशा फरकाने आघाडी घेतली आणि गेमच्या शेवटपर्यंत आघाडी कायमर राखून सामन्यात विजय मिळवला.

दरम्यान दुसऱ्या गेममध्ये युऑनने चांगले पुनरागमन करून शानदार प्रदर्शन केले. युऑनने चांगल्या खेळीनंतर सिंधूला अंकाच्या बाबतीत मागे टाकत राहिली. बदल्यात हैदराबादच्या २६ वर्षीय खेळाडूने आघाडी घेत आपल्या दुसऱ्या गेममध्ये विजय मिळवला.

आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना कोणाशी होणार हे पुढच्या गेमनंतर निश्चित होईल. कारण दक्षिण कोरियाचा सिम यू-जिन आणि स्पेनचा बीट्रिझ कोरालेस यांच्यातील लढत होणार आहे. या दोघांमधील विजयी खेळाडूसोबत सिंधू तिचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळेल.

तिने बुधवारी झालेल्या सामन्यात जपानच्या अया ओहोरीचा पराभव केला होता. तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात शानदार खेळी करून विजय मिळवत सिंधूने चांगलाच कमबॅक केला. दरम्यान गतविजेत्या सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करून तब्बल एक तास आणि दहा मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या ओहोरीचा १७-२१, २१-१७, २१-१७ अशा फरकाने पराभव केला होता.


हे ही वाचा: R Ashwin : अश्विनने एका दशकात जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉडसारख्या दिग्गज खेळाडूंना टाकले मागे