Tuesday, August 3, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा अखेरच्या षटकात ३५ धावा गरजेच्या, नो टेंशन! ‘या’ फलंदाजाने लगावले सहा षटकार

अखेरच्या षटकात ३५ धावा गरजेच्या, नो टेंशन! ‘या’ फलंदाजाने लगावले सहा षटकार

या फलंदाजाच्या भावाने गोलंदाजीत हॅटट्रिक घेतली होती.

Related Story

- Advertisement -

अंतिम सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना, अखेरच्या षटकात एखाद्या फलंदाजाने सहा षटकार मारत आपल्या संघाला सामना जिंकवून दिल्याचे कधी ऐकले आहे? असाच काहीसा प्रकार नुकताच एका टी-२० स्पर्धेत घडला. नॉर्दर्न आयर्लंडमधील एलव्हीएस टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रेगाघ संघाचा विजय जवळपास निश्चितच मानला जात होता. याचे कारण म्हणजे, बेलीमेना या संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात तब्बल ३५ धावांची आवश्यकता होती. परंतु, बेलीमेना संघाचा कर्णधार जॉन ग्लासने अखेरच्या षटकात सहा षटकार लगावले आणि आपल्या संघाला केवळ हा सामना नाही, तर ही स्पर्धाही जिंकवून दिली.

आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या क्रेगाघ संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांना ४० पैकी ३९ षटकांत बेलीमेना संघावर दबाव टाकण्यात यश आले होते. क्रेगाघने प्रथम फलंदाजी करताना १४७ धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना बेलीमेना संघाची १९ षटकांत ७ बाद ११३ अशी अवस्था होती आणि त्यांना विजयासाठी अखेरच्या षटकात ३५ धावांची आवश्यकता होती.

- Advertisement -

john glass
बेलीमेनाचा कर्णधार जॉन ग्लासने अंतिम षटकात प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर पोहोचवला

बेलीमेनाचा कर्णधार जॉन ग्लासने अंतिम षटकात तुफानी फटकेबाजी करताना प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर पोहोचवला. अंतिम षटकापूर्वी तो ५१ धावांवर नाबाद होता. अखेर त्याने नाबाद ८७ धावांची खेळी करत बेलीमेनाला हा सामना जिंकवून दिला. त्याआधी गोलंदाजीत जॉनचा भाऊ सॅम ग्लासने हॅटट्रिकची नोंद केली होती. त्याने सामन्यात केवळ पाच धावांत तीन विकेट घेतल्या. ग्लास बंधूंच्या दमदार कामगिरीमुळे बेलीमेना संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

- Advertisement -