ZIM vs BAN : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 3 धावांनी विजय; आता पाकिस्तानचे लक्ष भारताकडे

बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशने 3 धावांनी झिम्बाब्वेवर विजय मिळवला आहे. बांगलादेशने अटीतटीच्या लढतीत झिम्बाब्वेच्या हातातील सामना आपल्याकडे खेचून घेतला. या विजयासह बांगलादेशने टी-20 विश्वचषकात तिसरा विजय मिळवला आहे.

बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशने 3 धावांनी झिम्बाब्वेवर विजय मिळवला आहे. बांगलादेशने अटीतटीच्या लढतीत झिम्बाब्वेच्या हातातील सामना आपल्याकडे खेचून घेतला. या विजयासह बांगलादेशने टी-20 विश्वचषकात तिसरा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे बांगलादेशच्या या विजयामुळे पाकिस्तानला आघाडीचे स्वप्न पडायला लागले आहेत. तसेच, आज होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याकडेही पाकिस्तान लक्ष ठेवून आहे. कारण भारताने आफ्रिकेचा पराभव केल्यास पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरणार आहे. (Bangladesh Beat Zimbabwe by 3 Runs In T20 World Cup Pakistan have benefit)

बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात पाकिस्तानला पराभूत करणारा झिम्बाब्वे अपयशी ठरला. क्षेत्ररक्षणात केलेल्या चूकांमुळे झिम्बाब्वेचा पराभव झाला. सिन विलियम्स व रायन बर्ल यांनी झिम्बाब्वेचा संघर्ष सुरू ठेवला होता. त्यात No Ball च्या नाट्याने त्यांना एक संधीच मिळाली होती, परंतु अखेरच्या चेंडूवर फटका चूकला. झिम्बाब्वेने बांगलादेशला हा सामना सहजासहजी जिंकू दिला नाही.

या सामन्यात बांगलादेशचा सौम्या सरकार (0) व लिटन दास (14) या दोन अनुभवी फलंदाजांना माघारी पाठवून झिम्बाब्वेने सुरुवात तर चांगली केली. पण, नजमूल शांतो व शाकिब अल हसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली.

झिम्बाब्वेकडून आज क्षेत्ररक्षणात प्रचंड चुका झाल्या आणि त्याचा फायदा बांगलादेशने उचलला. शाकिबच्या (23) विकेटनंतर आफिफ होसैनने जोरदार फटकेबाजी करताना 19 चेंडूंत 29 धावा केल्या. शांतो 55 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 71 धावांवर बाद झाला. 20 व्या षटकात 3 विकेट्स गमावल्याने बांगलादेशला 7 बाद 150 धावांवर समाधान मानावे लागले.

तस्कीन अहमदने झिम्बाब्वेला हादरे दिले. अवघ्या 17 धावांवर त्यांचे दोन फलंदाज माघारी पाठवले. वेस्ली माधेव्हेरे (4) व क्रेग एर्व्हीन (8) माघारी परतल्यानंतर मिल्टन शुम्बा व सिन विलियम्स डाव सावरतील असे दिसत होते. पण, मुस्ताफिजूर रहमानने त्याच्या पहिल्याच षटकात शुम्बाला (8) बाद केले. शाकिबने मिड ऑफला अप्रतिम झेल टिपला. त्याच षटकात सिंकदर रजा (0) यालाही माघारी पाठवून रहमानने सामना बांगलादेशच्या बाजूने पूर्णपणे झुकवला.

बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिबने 19व्या षटकात सामना आपल्या बाजूने फिरवला. पहिल्या 3 चेंडूंवर 7 धावा आल्यानंतर चौथ्या चेंडूवर अविश्वसनीय क्षेत्ररक्षण करताना विलियम्सला रन आऊट केले. विलियम्सन 42 चेंडूंत 8 चौकारांसह 64 धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेला 6 चेंडूंत 16 धावा करायच्या होत्या. रिचर्डन एनगारावाने येताच चौकार-षटकार खेचला. मात्र, 3 चेंडूंत तो 10 धावा करून बाद झाला.

त्यानंतर 1 चेंडूत 5 धावा हव्या असताना अखेरचा चेंडू निर्धाव पडला आणि बांगलादेशने विजयाचा आनंद साजरा केला. पण, बांगलादेशच्या यष्टीरक्षकाने चेंडू स्टम्प्सच्या पुढे पकडला आणि नो बॉल दिला गेला. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा मैदानावर बोलावले गेले, पण बांगलादेशने फ्री हिटचा चेंडू निर्धाव ठेवण्यात यश मिळवले आणि 3 धावांनी सामना जिंकला.


हेही वाचा – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20मध्ये सूर्यकुमार यादवच्या रोहित, विराटपेक्षा अधिक धावा; राहुलही फॉर्मात