घरक्रीडाNZ vs BAN : बांगलादेशचा संघ खेळायला आला, पण टार्गेट किती हेच माहित...

NZ vs BAN : बांगलादेशचा संघ खेळायला आला, पण टार्गेट किती हेच माहित नव्हते!

Subscribe

या सामन्यात पावसाने सतत व्यत्यय आणला.

ग्लेन फिलिप्सने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशवर डकवर्थ-लुईस नियमानुसार २८ धावांनी मात केली. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. नेपियरच्या मॅक्लेन पार्क येथे झालेल्या या सामन्यात पावसाने सतत व्यत्यय आणला. पावसामुळे न्यूझीलंडचा डाव १७.५ षटकांनंतर थांबवण्यात आला. त्यावेळी त्यांची ५ बाद १७३ अशी धावसंख्या होती. त्यानंतर त्यांचा डाव पुन्हा सुरु झाला नाही. बांगलादेशचा संघ फलंदाजीला आला, तेव्हा त्यांना जिंकण्यासाठी नक्की किती धावांची आवश्यकता आहे हेच  माहित नव्हते. अखेर त्यांना १६ षटकांत १७१ धावांचे आव्हान मिळाले, पण ते १४२ धावाच करू शकले.

डकवर्थ-लुईस नियमावर प्रश्नचिन्ह  

बांगलादेशचा संघ फलंदाजीला आला, तेव्हा सुरुवातीला स्टेडियममधील स्कोअर बोर्ड, तसेच आयसीसीच्या वेबसाईटनुसार त्यांना विजयासाठी १६ षटकांत १४८ धावांची आवश्यकता होती. नंतर मात्र ही धावसंख्या चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आणि बांगलादेशला १७० धावांचे आव्हान मिळाले. मात्र, पुढे त्यातही बदल करण्यात आला. अखेर बांगलादेशला डकवर्थ-लुईस नियमानुसार सामना जिंकण्यासाठी १७१ धावांचे आव्हान मिळाले. त्यामुळे आता डकवर्थ-लुईस नियमावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

- Advertisement -

फिलिप्स, मिचेलने न्यूझीलंडला सावरले

त्याआधी या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर मार्टिन गप्टिल (२१) आणि फिन अ‍ॅलन (१७) यांनी न्यूझीलंडच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. यानंतर मात्र त्यांनी झटपट विकेट गमावल्याने त्यांची ५ बाद १११ अशी अवस्था होती. परंतु, ग्लेन फिलिप्सने ३१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावांची खेळी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. त्याला डेरेल मिचेलची (नाबाद ३४) उत्तम साथ लाभली. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला, तेव्हा न्यूझीलंडची १७.५ षटकांत ५ बाद १७३ अशी धावसंख्या होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -