घरक्रीडाBAN vs AUS : बांगलादेशमधील 'त्या' व्हिडीओवरून ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांची कर्मचाऱ्याशी हुज्जत

BAN vs AUS : बांगलादेशमधील ‘त्या’ व्हिडीओवरून ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांची कर्मचाऱ्याशी हुज्जत

Subscribe

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटवरील व्हिडीओवरून वाद झाला. 

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची ही मालिका १-४ अशा मोठ्या फरकाने गमावली. यजमान बांगलादेशने या मालिकेची दमदार सुरुवात केली होती. त्यांनी पहिले तिन्ही सामने जिंकत टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला आणि याचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला होता. परंतु, ही बाब ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि संघ व्यवस्थापक गॅविन डोव्ही यांना अजिबातच आवडली नाही.

लँगर आणि डोव्ही यांची कर्मचाऱ्यासोबत हुज्जत

टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतल्यावर बांगलादेशचे खेळाडू जल्लोष करतानाचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया पेजवर पोस्ट करण्यात आला. तसेच या व्हिडीओत बांगलादेश संघाचे गाणेही होते. हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत लँगर आणि डोव्ही यांनी हुज्जत घातल्याची माहिती ‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ या ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्राने दिली आहे.

- Advertisement -

लँगर यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार 

बांगलादेश संघाचे गाणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटवर टाकणे योग्य नसल्याचे डोव्ही यांचे म्हणणे होते. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सोशल मीडिया हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याने आपण कोणतीही चूक केली नसल्याचे म्हटले. त्यामुळे हे प्रकरण अधिकच वाढले आणि लँगर यांनीही या कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. लँगर यांना या प्रकरणाविषयी विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने सांगितले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -