घरक्रीडाबांगलादेश भारतीय संघाला झुंज देईल!

बांगलादेश भारतीय संघाला झुंज देईल!

Subscribe

भारतीय संघाने कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सहजपणे पराभव केला. मात्र, त्याआधी या दोन संघांमधील टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत संपली होती. भारतीय संघापुढे आता बांगलादेशचे आव्हान असणार आहे. बांगलादेशचा संघ भारतीय दौर्‍यात तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दोन संघांतील पहिला टी-२० सामना ३ नोव्हेंबरला दिल्ली येथे होईल. या टी-२० मालिकेत बांगलादेशचा संघ भारताला चांगली झुंज देईल, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मणने व्यक्त केले.

बांगलादेशचा संघ भारताला चांगली झुंज देईल, असे मला वाटते. बांगलादेशच्या संघाला सध्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघापेक्षा जास्त अनुभव आहे आणि बांगलादेशचे खेळाडू चांगले फॉर्मात आहेत. त्यांनी मागील काही वर्षांत खूप प्रगती केली आहे. त्यामुळे भारताला टी-२० मालिका जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे, असे लक्ष्मण म्हणाला.

- Advertisement -

बांगलादेशच्या खेळाडूंनी सध्या संप पुकारला आहे. त्यामुळे ते भारतीय दौर्‍यावर येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्ड यावर तोडगा काढेल आणि बांगलादेशचा संघ भारत दौर्‍यावर येईल हा सौरव गांगुलीला विश्वास आहे. गांगुलीची बुधवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -