घरक्रीडाबार्सिलोनाने उडवला विलारेयालचा धुव्वा

बार्सिलोनाने उडवला विलारेयालचा धुव्वा

Subscribe

बार्सिलोनाचा संघ ला लिगाच्या गुणतक्त्यात ७३ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून त्यांच्यात आणि पहिल्या स्थानावरील रियाल माद्रिदमध्ये (७७ गुण) केवळ ४ गुणांचा फरक आहे. 

बार्सिलोनाने स्पेनमधील फुटबॉल स्पर्धा ला लिगाच्या सामन्यात विलारेयाल संघाचा ४-१ असा धुव्वा उडवला. हा बार्सिलोनाचा मागील पाच सामन्यांत पहिलाच विजय होता. त्यामुळे त्यांनी जेतेपदाच्या आशा कायम राखल्या आहेत. ३४ सामन्यांनंतर बार्सिलोनाचा संघ ला लिगाच्या गुणतक्त्यात ७३ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून त्यांच्यात आणि पहिल्या स्थानावरील रियाल माद्रिदमध्ये (७७ गुण) केवळ ४ गुणांचा फरक आहे.

मध्यंतराला ३-१ अशी आघाडी

विलारेयालविरुद्ध पॉ टॉरेसच्या स्वयंगोलमुळे बार्सिलोनाला तिसऱ्याच मिनिटाला आघाडी मिळाली. परंतु, ही आघाडी फार काळ टिकू शकली नाही. १४ व्या मिनिटाला जेरार्ड मोरेनोने गोल करत विलारेयाल संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. मात्र, २० व्या मिनिटाला लुईस सुआरेझ, तर ४५ व्या मिनिटाला अँटोन ग्रीझमनने केलेल्या गोलमुळे मध्यंतराला बार्सिलोनाकडे ३-१ अशी आघाडी होती. उत्तरार्धातही त्यांनी विलारेयालला पुनरागमनाची संधी दिली नाही. याउलट ८७ व्या मिनिटाला आंसू फाटीने गोल करत बार्सिलोनाला ४-१ असा विजय मिळवून दिला.

- Advertisement -

रियाल माद्रिद विजयी 

कर्णधार सर्जिओ रॅमोसच्या गोलमुळे रियाल माद्रिदने अॅथलेटिक क्लबचा १-० असा पराभव केला. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र रियालने त्यांच्या खेळात सुधारणा केली. त्यांना ७३ व्या मिनिटाला पेनल्टी मिळाला, ज्यावर रॅमोसने गोल करत रियालला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखत हा सामना जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -