घरक्रीडा'या' माजी क्रिकेटपटूच्या उपचारासाठी बीसीसीआयने केली आर्थिक मदत

‘या’ माजी क्रिकेटपटूच्या उपचारासाठी बीसीसीआयने केली आर्थिक मदत

Subscribe

बडोदा रणजी ट्रॉफीचे माजी कर्णधार जेकब मार्टिन ची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरु आहे. उपचाराचे पैसे न भरल्यामुळे रुग्णालयाने उपचार थांबवले होते. यामुळे मार्टीनच्या कुटुंबीयांनी बीसीसीआयकडे आर्थिक मदत मागितली होती.

बडोदा रणजी ट्रॉफीचे माजी कर्णधार जेकब मार्टिन यांची प्रकृती गंभीर आहे. मार्टिनला रुग्णालयात दाखल केले असून त्याला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्याच्या उपचारासाठी बीसीसीआयची मदत मागितली आहे. अपघातामुळे मार्टिन मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. बडोद्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. बीसीसीआयने मार्टिनच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत केली आहे. बरोबर बडोदा क्रिकेट संघानेही तीन लाखांची आर्थिक मदत केली आहे. बीसीसीआयचे माजी सचिव संजय पटेल यांनी मार्टिनला ही मदत देऊ केली आहे.

“जेव्हा मला मार्टिनच्या अपघाताबद्दल कळाले तेव्हा मी त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावलो. मी अजून काही लोकांशी बोललो आहे. अगोदरच  रुग्णालयाचे बील ११ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पैसे नसल्यामुळे रुग्णालयाने मार्टिनवर उपचार करणे थांबवले होते. बीसीसीआय कडून पैसे मिळाल्यानंतर आता उपचार पून्हा सुरु झाले आहेत.” – संजय पटेल

- Advertisement -

मार्टिनने भारतासाठी १९९९ ते २००१ पर्यंत दहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. याचसोबत बडोदा येथे अनेक सामने खेळून प्रतिनिधित्व केले. २०११ मध्ये मार्टिनला दिल्ली पोलिसांनी मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -