घरक्रीडागोलंदाजाच्या भरतनाट्यम स्टाईलमुळे थोडक्यात बचावला फलंदाज, पाहा VIDEO

गोलंदाजाच्या भरतनाट्यम स्टाईलमुळे थोडक्यात बचावला फलंदाज, पाहा VIDEO

Subscribe

गोलंदाजाच्या शैलीचा व्हिडीओ युवराज सिंगने केला शेअर

क्रिकेटचा समाना खेळताना अनेक खेळाडू आपल्या निराळ्या स्टाईलमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. याचे प्रचंड व्हायरल व्हिडीओ आपण पाहिले आहेत. असाच एक भरतनाट्यम स्टाईल गोलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असे तीन प्रमुख विभाग आहेत. फलंदाज आपल्या शैलीत विविध प्रकारे चेंडू टोलवताना दिसतात. तसेच गोलंदाजही वेगवेगळ्या प्रकारात गोलंदाजी करताना दिसून येतात. अगदी आंतरराष्ट्रीय सामन्यातही खेळाडू वेगवेगळ्या प्रकारात गोलंदाजी करतात. यॉर्कर, बाउंसर, लेग स्पिन आणि ऑफ स्पिन, फुल टॉस अशा प्रकारांचा वापर करत गोलंदाजी करतात. आंतरराष्ट्रीय गोलंदाजांसह जगातील अनेक भागांतून वेगवेगळ्या गोलंदाजी स्टाईलचा व्हिडीओ व्हायरल होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

- Advertisement -

भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने एक अनोखा व्हिडीओ आपल्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओतील फलंदाज चक्क भरतनाट्यम स्टाईलमध्ये गोलंदाजी करत असल्याचे दिसत आहे. गोलंदाजाच्या या भरतनाट्यम स्टाईलवरील चेंडूला टोलवताना फलंदाजाची चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसत आहे. या चेंडूवर बाद होता होता थोडक्यात बचावला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काही मुले क्रिकेटचा सराव करत असल्याचे दिसून येत आहे. युवराज सिंगने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत भारतीय गोलंदाज हरभजन सिंगला प्रश्न विचारला आहे.

युवराज सिंगने व्हिडीओ शेअर केला असून भारतीय गोलंदाज हरभजन सिंगला प्रश्न विचारत असे कॅप्शन दिले आहे की, भरतनाट्यम स्टाईल ऑफ स्पिन! हरभजन सिंग तुला या स्टाईलविषयी काय मत आहे. युवराजने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. युवराजने विचारलेल्या प्रश्नाला गोलंदाज हरभजन सिंग काय उत्तर देतो याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -