घरक्रीडाफलंदाजांनी गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरवले - रहाणे

फलंदाजांनी गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरवले – रहाणे

Subscribe

भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाचे खापर भारतीय फलंदाजांवर फोडले आहे. भारतीय गोलंदाजांनी या मालिकेत चांगले प्रदर्शन करूनही भारतीय संघाला ही मालिका जिंकता आली नाही. 

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आहे. भारतीय गोलंदाजांनी या मालिकेच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांत इंग्लंडच्या २० विकेट घेण्यात यश आले. असे असूनही भारताला या मालिकेत अवघा एक सामना जिंकता आला आहे. याचे कारण म्हणजे भारतीय फलंदाजांचे खराब प्रदर्शन. कोहली वगळता एकही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. या मालिकेतील अखेरच्या सामन्याआधी भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे म्हणाला की भारतीय गोलंदाजांनी जी चांगली कामगिरी केली त्यावर भारतीय फलंदाजांनी पाणी फिरवले.

फलंदाज कमी पडले 

रहाणे भारताच्या फलंदाजांबाबत म्हणाला, “इंग्लंडमध्ये खेळताना संयम आवश्यक आहे. मग तो फलंदाज असो की गोलंदाज. गोलंदाजाना एका विशिष्ट टप्प्यावर बॉल टाकावा लागतो आणि आमच्या गोलंदाजांनी अगदी तेच केले. त्यांनी या मालिकेत अप्रतिम गोलंदाजी केली. पण आम्ही फलंदाजांनी त्यांना चांगली साथ दिली नाही. सगळे फलंदाज अनुभवी असूनही आम्ही कुठेतरी कमी पडलो.”

मी चांगले योगदान दिले नाही 

स्वतःच्या प्रदर्शनाविषयी रहाणे म्हणाला, “मी या मालिकेत फार चांगले प्रदर्शन केलेले नाही. मला अजून धावा करायला आवडल्या असत्या. पण मागच्या दोन सामन्यात एकदा ५० तर एकदा ८० धावा केल्या. त्यामुळे सध्या माझी फलंदाजी चांगली होत आहे. आता  शेवटच्या चांगला खेळ करण्यावर माझा भर असेल.”

वेगवान गोलंदाजांची कमाल

भारतीय गोलंदाजांनी या मालिकेत दमदार प्रदर्शन केले आहे. भुवनेश्वर कुमारसारखा गोलंदाज नसतानाही इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या पेस तिघडीने अप्रतिम प्रदर्शन केले. त्यामुळे भारताला ही मालिका जिंकायची संधी होती. पण फलंदाजांच्या खराब कामगिरीमुले ते शक्य झाले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -