घरक्रीडाडीएफबी पोकाल : बायर्न म्युनिकला अजिंक्यपद

डीएफबी पोकाल : बायर्न म्युनिकला अजिंक्यपद

Subscribe

एकाच मोसमात बुंडसलिगा आणि डीएफबी पोकाल या दोन स्पर्धा जिंकण्याची ही म्युनिकची तब्बल १३ वी वेळ होती.

बायर्न म्युनिकने अंतिम सामन्यात बायर लेव्हरकुसेनचा ४-२ असा पराभव करत डीएफबी पोकाल फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. म्युनिकने याआधीच ‘बुंडसलिगा’ स्पर्धा सलग आठव्यांदा जिंकली होती. एकाच मोसमात बुंडसलिगा आणि डीएफबी पोकाल या दोन स्थानिक स्पर्धा जिंकण्याची ही म्युनिकची तब्बल १३ वी वेळ होती. कोरोनामुळे मार्चपासून युरोपातील फुटबॉल स्पर्धा बंद होत्या. परंतु, मेपासून जर्मनीतील स्पर्धा पुन्हा सुरु झाल्या. त्यानंतर बायर्न म्युनिकने सर्व स्पर्धांत मिळून सलग ११ सामने जिंकले.

लेव्हनडोस्कीचे दोन गोल

बायर लेव्हरकुसेनविरुद्धच्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. १६ व्या मिनिटाला त्यांना फ्री-किक मिळाली. यावर डेविड आलाबाने गोल करत म्युनिकला १-० अशी आघाडी मिळवून दिली. २४ व्या मिनिटाला सर्ज गनाब्रीने म्युनिकची आघाडी दुप्पट केली. त्यांनी ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राखली. पुढे रॉबर्ट लेव्हनडोस्कीच्या गोलमुळे म्युनिकला ३-० अशी आघाडी मिळाली. यानंतर स्वेन बेण्डरने गोल करत लेव्हरकुसेनच्या पुनरागमनाच्या आशा जिवंत केल्या. परंतु, ८९ व्या मिनिटाला लेव्हनडोस्कीने आपला दुसरा आणि म्युनिकचा चौथा गोल केला. ९० मिनिटांनंतरच्या अतिरिक्त वेळेत लेव्हरकुसेनच्या काय हावेर्ट्झने पेनल्टीवर गोल केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. म्युनिकने हा सामना ४-२ असा जिंकत ही स्पर्धाही जिंकली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -