आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ 2 खेळाडूंचे पुनरागमन

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून, रोहित शर्मा कर्णधार तर के. एल. राहुलकडे उपकर्णधार पद सोपवण्यात आले आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून, रोहित शर्मा कर्णधार तर के. एल. राहुलकडे उपकर्णधार पद सोपवण्यात आले आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. (BCCI Announced Indian Cricket Team For ICC T20 Cup)

यष्ठीरक्षक ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच, मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर यांनी राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे.

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या दोन वेगवान गोलंदाजांना दुखापत झाल्यामुळे संघात स्थान मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, हे दोघेही आता दुखापतीतून सावरल्याने दोघांचे संघात पुनरागमन झाले आहे.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

 • मोहम्मद शमी
 • दीपक चाहर
 • रवी बिश्नोई
 • श्रेयस अय्यर

टी-20 विश्वचषक 2022 साठी 16 संघ पात्र

 • ऑस्ट्रेलिया
 • अफगाणिस्तान
 • बांगलादेश
 • इंग्लंड
 • भारत
 • नामिबिया
 • न्यूझीलंड
 • पाकिस्तान
 • स्कॉटलंड
 • दक्षिण आफ्रिका
 • श्रीलंका
 • वेस्ट इंडिज
 • आयर्लंड
 • यूएई
 • नेदरलँड्स
 • झिम्बाब्वे

आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकला नाही. भारताने दोन सामने जिंकत सर्वात आधी सुपर 4 मध्ये स्थान मिळवले. सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर आता भारतीय संघ टी20 वर्ल्ड कप 2022 साठी सज्ज झाला आहे.


हेही वाचा – आशिया चषक 2022 : अंतिम सामना विजयानंतर श्रीलंकेच्या संघावर भरघोस पैशांचा पाऊस