घरक्रीडावेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

Subscribe

आयपीएलनंतर भारतीय संघ मालिका खेळण्यामध्ये व्यस्त झाला आहे. सध्या इग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी खेळाडूंचीही निवड करण्यात आली असून, कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे.

आयपीएलनंतर (IPL 2022) भारतीय संघ (Indian Cricket Team) मालिका खेळण्यामध्ये व्यस्त झाला आहे. सध्या इग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी खेळाडूंचीही निवड करण्यात आली असून, कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० आणि वनडे मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजसोबत (West Indies) तीन वनडे सामने खेळणार आहे. (BCCI announced team for west indies tour)

वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची बुधवारी बीसीसीआयने (BCCI) घोषणा केली आहे. यावेळी बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तर ज्यांना चागली कामगिरी करता आली नाही त्यांनाही पुन्हा संघात संधी देण्यात आली आहे. यामध्ये संजू सैमसन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. तसेच, आयपीएलपासून फॉर्ममध्ये असणाऱ्या ईशान किशन, शुभमन गिल यांनाही या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

बीसीसीआयने फक्त वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. मात्र, टी-२० संघाची घोषणा नंतर केली जाणार आहे. दरम्यान, आगामी काळात टी-२० विश्वचषक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनुभवी खेळाडूंना या संघात स्थान देण्याची शक्यता आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :

- Advertisement -

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन वनडे मालिका होणार आहे. पहिला वनडे सामना २२ जुलै रोजी होणार आहे. तसेच, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २४, २७ जुलै रोजी होणार आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर नुकताच झालेला पाचवा कसोटी सामना पराभूत झाला. कोरोनामुळे इंग्लंड आणि भारताचा कसोटी मालिकेतील पाचवा सामना पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार १ ते ५ जुलै या कालावधीत खेळवण्यात आला. या कसोटी सामन्याकरीता भारतीय संघाचे कर्णधार पद जसप्रीत बुमराहकडे देण्यात आले होते.


हेही वाचा – इंग्लंड विरोधात भारताचा लज्जास्पद पराभव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -