घरक्रीडाBCCIकडून इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, 'या' खेळाडूंनी केले कमबॅक

BCCIकडून इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंनी केले कमबॅक

Subscribe

कोणाला मिळालं संघात स्थान?

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना जिंकला आहे. भारतीय संघाने ब्रिस्बेनमधील कसोटीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी एतिहासिक खेळी करत विजयावर शिक्कमोर्तब केला आहे. भारतीय संघ आता भारतात परतणार आहे. आता इंग्लंड आणि भारतीय संघात एक दिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये ५ फेब्रुवारीपासून कसोटीला सुरुवात होणार आहे. या सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व कोणाकडे असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

भारतीय संघ आणि इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीला पहिला सामना खेळवण्यात येईल. भारतीय संघ आणि इंग्लंड संघात ४ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेत तिसरा सामना हा डे-नाईट असणार आहे. तसेच मालिकेत २ सामने चेन्नई तर २ सामने अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताचा कर्नधार विराट कोहली रजेवर असून त्याची रजा आता संपत आली आहे. त्यामुळे विराट कोहली संघात पुनरागमन करणार आहे. परंतु या कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल

नेट बॉलर्स : अंकित राजपूत, अवेश खान, संदिप वॉरियर, सौरभ कुमार, क्रिश्नप्पा गौथम
राखीव खेळाडू : के.एस. भरत, अभिमन्यू ईश्वरन, शानबाज नदिम, राहूल चहर, प्रियंक पांचाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -