9 टी-20, 6 वनडे आणि 4 कसोटी; भारतीय संघाचे आगामी काळातील वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील तीन मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील तीन मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिकाही खेळणार आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाचा संघही फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. (BCCI Announces Schedule For Home Series Against Sri Lanka New Zealand Australia)

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकांनंतर भारतीय संघ मायदेशातच न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका हैदराबाद, रायपूर आणि इंदूर येथे पार पडेल. याशिवाय भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिकाही खेळणार आहे.

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे.

भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

 • 3 जानेवारी, मंगळवार – पहिला टी-20 सामना, मुंबई
 • 5 जानेवारी, गुरूवार – दुसरा टी-20 सामना, पुणे
 • 7 जानेवारी, शनिवार – तिसरा टी-20 सामना, राजकोट
 • 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
 • 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
 • 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम

भारत विरूद्ध न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक

 • 18 जानेवारी, बुधवार, पहिला वन डे सामना, हैदराबाद
 • 21 जानेवारी, शनिवार, दुसरा वन डे सामना, रायपूर
 • 24 जानेवारी, मंगळवार, तिसरा वन डे सामना, इंदौर
 • 27 जानेवारी, शुक्रवार, पहिला टी-20 सामना, रांची
 • 29 जानेवारी, रविवार, दुसरा टी-20 सामना, लखनौ
 • 1 फ्रेब्रुवारी, बुधवार, तिसरा टी-20 सामना, अहमदाबाद

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

 • 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
 • 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
 • 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
 • 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका

 • 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई
 • 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
 • 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई

हेही वाचा – बांगलादेशचा भारतावर सनसनाटी विजय, ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी