IPL 2022 : BCCIकडून अहमदाबाद टीमला मंजूरी, कोण होणार टीमचा कर्णधार?

TATA IPL Title Sponsor tata group replace vivo in ipl 2022 season tournament
TATA IPL Title Sponsor : आयपीएलचा 'विवो'ला अलविदा, यंदाच्या हंगामात नव्या टायटल स्पॉन्सरची एन्ट्री

सट्टेबाजीच्या आरोपात अडकलेल्या अहमदाबाद टीमला भारतीय नियामक मंडळाने मान्यता दिली आहे. बीसीसीआयने सोमवारी अहमदाबादला लेटर ऑफ इटेंन्ट सुपूर्द केलं. त्यामुळे आता मेगा ऑक्शन म्हणजे लिलावाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यंदाच्या वर्षात आयपीएलमध्ये २ नव्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांचा समावेश असणार आहे.

अहमदाबाद संघ विकत घेणाऱ्या सीव्हीसी ग्रुपचे सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. परंतु बीसीसीआयने एक कमिटी गठीत केली. त्यानंतर बीसीसीआयने एक रिपोर्ट जारी केला. यामध्ये अहमदाबाद टीमला सीव्हीसी ग्रुपने एकूण ५ हजार ६२५ कोटी रूपयांना विकत घेतलं होतं. परंतु बीसीसीआयने अहमदाबादला लेटर ऑफ इटेंन्ट सुपूर्द केल्यामुळे त्यांचा लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. लखनुऊ टीमला आरपी-संजीव गोयंन्का ग्रुपने ७ हजार ९० कोटी रूपयांना विकत घेतलं आहे.

अहमदाबाद टीमचा कोण होणार कर्णधार?

मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर आणि वेगवान फलंदाज हार्दिक पंड्याला कर्णधारपद दिलं जा णार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या हार्दिक पंड्या त्याच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर आहे. तो आपल्या फिटनेसवर काम करत आहे. हार्दिक पंड्याच्या आधी श्रेयस अय्यरचं नाव अग्रस्थानी होतं. परंतु या दोन्ही खेळाडूंपैकी कोणता खेळाडू कर्णधार होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

देशात कोरोना विषाणू्ने कहर केला असून आता तिसरी लाटेला सुरूवात झाली आहे. देशात एक लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे आयपीएल मार्च महिन्यात भारतात होणार की यूएईमध्ये खेळवली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी सेना भाजप युतीचा आठवलेंनी सांगितला फॉर्म्युला