घरक्रीडाबीसीसीआय २०१८च्या पुरस्कारांची यादी जाहीर

बीसीसीआय २०१८च्या पुरस्कारांची यादी जाहीर

Subscribe

विराट कोहली पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानीत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या २०१८ च्या पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे. या पुरस्करांचे वितरण १२ जूनला बंगळुरू येथे होणार आहे. भारतीय कर्णधार विराट याला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटरसाठी पॉली उमरीगर पुरस्कार मिळाला आहे. विराटचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. २०१६ आणि २०१७ मध्ये विराटने सर्वच क्रिकेट प्रकारात अभूतपूर्व फॉर्म दाखवला आहे. त्याने २०१६ सालात कसोटी प्रकारात ७५ च्या सरासरीने १२१५ धावा काढल्यात तर एकदिवसीय प्रकारात ९४ च्या सरासरीने ७३९ धावा केल्या आहेत. तसेच २०१७ सालात विराटने एकदिवसीय सामन्यात ७६ च्या सरासरीने १४६० धावा काढत आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील ९००० धावा पूर्ण केल्या आहेत.

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाही सन्मानित

भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीच्या खेळाडू हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनाही त्यांच्या २०१७ च्या महिला विश्वचषक स्पर्धेतील चमकदार कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हरमनप्रीत कौर ही सध्या भारताची टी-२० कर्णधार आहे. २०१७ च्या विश्वचषकात इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध अनुक्रमे ९० आणि नाबाद १०६ धावांची धमाकेदार खेळी केली होती. तसेच स्मृती मंधानाने सहा वेळा वर्ल्डकप विजेता ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौफेर फटकेबाजी करत नाबाद १७१ धावा फटकावल्या. महिला विश्वचषकाच्या इतिहासातील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

- Advertisement -
kaur and mandhana
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना

विराटच्या कामगिरीचा चढता आलेख

विराट कोहलीने १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर २० जून २०११ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. यानंतर २१ फेब्रुवारी २०१० रोजी टी-२० मध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने २०८ एकदिवसीय सामन्यात ९,५८८ धावा केल्या आहेत. ज्यात ३५ शतकांचा तर ४६ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांत १८३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याच बरोबर ६६ कसोटी सामन्यांत त्याने ५,५५४ धावा केल्या आहेत. ज्यात २१ शतकांचा तर १६ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये २४३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ९७ सामन्यांत विराटने १९८३ धावा केल्या असून यामध्ये १८ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९० ही त्याची टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

virat
भारतीय कर्णधार विराट कोहली
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -