Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा BCCI Central Contracts : हार्दिकला प्रमोशन; विराट, रोहित करणार ७ कोटींची कमाई

BCCI Central Contracts : हार्दिकला प्रमोशन; विराट, रोहित करणार ७ कोटींची कमाई

यंदा एकूण २८ खेळाडूंची अ+, अ, ब आणि क अशा ४ श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी मोसमासाठी खेळाडूंची वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. यंदा एकूण २८ खेळाडूंची अ+, अ, ब आणि क अशा ४ श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ‘अ+’ या सर्वोच्च श्रेणीमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंना जागा देण्यात आली आहे. तसेच अष्टपैलू हार्दिक पांड्याचे अ श्रेणीत प्रमोशन झाले आहे. अ+ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी, अ श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि क श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये मिळणार आहेत.

हार्दिक ‘ब’मधून ‘अ’ श्रेणीत

विराट, रोहित आणि बुमराह हे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचे प्रमुख खेळाडू मानले जातात. त्यामुळे या तिघांचा सर्वोच्च श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याला मागील काही काळात दुखापतींनी सतावले आहे. असे असतानाही त्याला बढती मिळाली आहे. मागील वर्षी ब श्रेणीत असलेल्या हार्दिकचा यंदा अ श्रेणी समावेश करण्यात आला आहे. ‘हार्दिक लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. तसेच अ+ श्रेणीतील खेळाडूंव्यतिरिक्त तो टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावेल,’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

खेळाडूंची यादी –

- Advertisement -

अ+ श्रेणी (७ कोटी) : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

अ श्रेणी (५ कोटी) : रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पांड्या

- Advertisement -

ब श्रेणी (३ कोटी) : वृद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, मयांक अगरवाल

क श्रेणी : कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज

- Advertisement -